Home / महाराष्ट्र / Awhad Meet Fadnavis : मुंबई क्रिकेट असो. निवडणूक; आव्हाड-फडणवीस यांची भेट

Awhad Meet Fadnavis : मुंबई क्रिकेट असो. निवडणूक; आव्हाड-फडणवीस यांची भेट

Awhad Meet Fadnavis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची (Devendra Fadnavis) भेट घेतली....

By: Team Navakal
Awhad Meet Fadnavis

Awhad Meet Fadnavis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची (Devendra Fadnavis) भेट घेतली. या दोन नेत्यांमध्ये काल रात्री सुमारे ४० मिनिटे चर्चा झाल्याची माहिती आहे. या भेटीमागील तपशील अद्याप समोर आलेला नसला तरी, आगामी १२ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मुंबई क्रिकेट असोसिएशन (Mumbai Cricket Association) अध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याची माहिती आहे.

काल सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या एका कार्यक्रमात शरद पवार, आशिष शेलार, अजिंक्य नाईक, मिलिंद नार्वेकर आणि जितेंद्र आव्हाड हे नेते उपस्थित होते. यावेळी शरद पवार आणि आशिष शेलार यांच्यात जवळपास २० मिनिटे चर्चा झाली. याच कार्यक्रमानंतर, गरवारे क्लबमध्ये सुमारे १ तास ही बैठक पार पडली. बैठकीनंतर जितेंद्र आव्हाड हे शरद पवार यांच्यासोबत त्यांच्या गाडीतून निघून गेले. त्यानंतर रात्री १० वाजताच्या सुमारास आव्हाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. या सलग बैठकींमुळे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीसाठी नव्या समीकरणांची शक्यता वर्तवली जात आहे. मागील निवडणुकीतही शरद पवार आणि आशिष शेलार यांच्या गटांनी ऐनवेळी एकत्र येऊन अनपेक्षित निकाल लावला होता. यंदाच्या निवडणुकीतही अशाच प्रकारची राजकीय डावपेचांची पुनरावृत्ती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


हे देखील वाचा –

एलआयसीवर केंद्राचा दबाव; अदानीत अब्जावधीची गुंतवणूक

विमानात मराठी अमराठी वाद पेटला; मुंबईत जाताय मराठी यायलाच हवी..

राम मंदिराचे काम पूर्ण झाले; मोदी धर्मध्वज फडवकणार

Web Title:
संबंधित बातम्या