Home / आरोग्य / Jowar VS Ragi : आहारात कोणत्या भाकरीचा समावेश करावा? वजन कमी करण्यासाठी हि भाकरी नक्की खा!

Jowar VS Ragi : आहारात कोणत्या भाकरीचा समावेश करावा? वजन कमी करण्यासाठी हि भाकरी नक्की खा!

Jowar VS Ragi : आज काल लोक आरोग्य संदर्भात प्रचंड जागरूक झालेली पाहायला मिळतात. त्वचेसाठी आणि वजन कमी करण्यासाठी काय...

By: Team Navakal
Jowar VS Ragi

Jowar VS Ragi : आज काल लोक आरोग्य संदर्भात प्रचंड जागरूक झालेली पाहायला मिळतात. त्वचेसाठी आणि वजन कमी करण्यासाठी काय खावं यावर बऱ्याचदा ते सतर्क असताना सुद्धा दिसतात पण अनेकदा काय खावे किंवा काय टाळावे, यावरुन बहुतांश लोकांचा गोंधळ उडालेला दिसतो. अनेक लोकांना भाकरी कोणती खावी यावरून देखील संभ्रम असतो. नाचणीची भाकरी खावी का बाजरीची भाकरी खावी यावर अनेक तर्क वितर्क लावले जातात. खर तर बाजरी असो किंवा नाचणी दोनीही भाकऱ्या ह्या शरीरासाठी उत्तमच असतात. पण त्यातली कोणती भाकरी तुमच्या शरीर रचनेला अनुरूप ठरेल हे तुम्ही डॉक्टरांच्या मदतीने बघू शकता.

ज्वारीची भाकरी खाण्याचे फायदे – Jowar Benefits | Jowar Roti Benefits | Jwari Roti Benefits

ज्वारीच्या भाकरीद्वारे शरीराला प्रोटीनचा पुरवठा होईल. स्नायूपेशी देखील मजबूत राहतात, वजन कमी होण्यास मदत होते. ज्वारीमध्ये फायबर अधिक प्रमाणात असते, ज्यामुळे पोट दीर्घकाळासाठी भरलेलेच राहते आणि पोटाचे आरोग्य निरोगी राहते. ज्वारीमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स मध्यम प्रमाणात असते, त्यामुळे रक्तशर्करेची पातळी अचानक वाढत नाही तर शरीरातील ऊर्जा टिकून राहण्यास मदत मिळते. वारंवार लागणाऱ्या भूकेच्या समस्येतून सुटका होते. ज्वारीतील लोह आणि अँटी-ऑक्सिडंट्समुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत मिळते. तर आजारांपासून शरीराचे संरक्षण होते. जलदगतीने वजन कमी करायचं असेल तर डाएटमध्ये ज्वारीच्या भाकरीचा समावेश करणे फायदेशीर ठरेल.

नाचणीची भाकरी खाण्याचे फायदे | Ragi Benefits | Ragi Roti Benefits | Nachani Roti Benefits

कॅल्शिअमचा सर्वोत्तम स्त्रोत म्हणजे नाचणी. नाचणीच्या भाकरीमुळे शरीराचे वजन कमी होतेच शिवाय शरीराची हाडे देखील मजबूत राहण्यास मदत होते. ज्वारीच्या तुलनेत नाचणीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, यामुळे पोट दीर्घकाळासाठी भरलेले राहते. परिणामी वारंवार भूक लागण्याची समस्या नाहीशी होते. नाचणीतील ग्लायसेमिक इंडेक्स सर्वाधिक कमी असते, यामुळे रक्तशर्करेची पातळी कमी होण्यास देखील मदत मिळते. म्हणून मधुमेहग्रस्तांना देखील नाचणी खाण्याचा सल्ला दिला जातो.

नाचणी खावी कि ज्वारीची भाकरी खावी, वजन कमी करण्यासाठी कोणती भाकरी खावी? | Weight Loss Roti
तुमच्या शरीराच्या आवश्यकतेनुसार दोन्ही भाकऱ्यांचा समावेश तुम्ही आहारामध्ये करू शकता. एक दिवस ज्वारीची दुसऱ्या दिवशी नाचणीची पोळी असा आहार तुम्ही फॉलो केला तरीही चालतो. किंवा काही घरांमध्ये दोन्ही धान्य समसमान प्रमाणात मिक्स करून त्यापासून तयार केलेल्या भाकरीचे सेवन करतात.

१. ज्वारीमध्ये प्रोटीनचे प्रमाण अधिक असते तर कॅलरीचे प्रमाण कमी आहे, त्यामुळे ज्वारीच्या पोळीमुळे वजन पटकन कमी होण्यास मदत मिळते. पण हाडांसाठी नाचणीचा डाएटमध्ये समावेश करावा.

२. नाचणी आणि ज्वारी दोन्ही धान्य ग्लुटेन फ्री आहेत आणि फायबरचे प्रमाण जास्त आहे. यामुळे पोटाचे आरोग्य निरोगी राहण्यासअधिक मदत होते. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी मर्यादित स्वरुपात भाकरीचे सेवन करावे.

३. ज्वारी आणि बाजरीचे पीठ समसम प्रमाणात एकत्रित कल्याने आणि त्याची भाकरी खाल्याने शरीराला प्रोटीन, कॅल्शिअम आणि फायबरचा पुरवठा होईल.


हे देखील वाचा –Railway Recruitment 2025 : रेल्वेत सरकारी नोकरीची संधी.. अर्ज भरण्याची शेवटची तारीख कोणती?

(टिप: या माहितीची पुष्टी आम्ही करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Web Title:
For more updates: , , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या