Home / महाराष्ट्र / Kalyan News : ट्रेनमध्ये ‘हिंदी – मराठी’ वादावरुन तरुणाला बेदम मारहाण; तणावातून केली आत्महत्या

Kalyan News : ट्रेनमध्ये ‘हिंदी – मराठी’ वादावरुन तरुणाला बेदम मारहाण; तणावातून केली आत्महत्या

Kalyan News : जगाच्या प्रत्यक कोपऱ्यात कुठेना कुठे कोणत्या ना कोणत्या कारणावरून सतत वाद होतच असतो. आपण फार काळ हे...

By: Team Navakal
Kalyan News
Social + WhatsApp CTA

Kalyan News : जगाच्या प्रत्यक कोपऱ्यात कुठेना कुठे कोणत्या ना कोणत्या कारणावरून सतत वाद होतच असतो. आपण फार काळ हे वाद उराशी बाळगुन बसत नाही. पण काही लोकांच्या मात्र हे वाद उराशी लागतात. पण काही वाद हे इतके भयंकर असतात ते विसरण्याचा प्रयन्त केला तरी ते विसरता येत नाही अशीच एक घटना कल्याणमध्ये घडली आहे. ट्रेनमध्ये झालेल्या वादातून मानसिक तणावात असलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याने आपली जीवन यात्रा संपवली आहे. कल्याण पूर्व येथील तिसगाव नाका परिसरातील ही मन सुन्न करणारी घटना घडली आहे. अर्णव खैरे असं या आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याच नाव आहे.

अर्णव मुलुंड येथे कॉलेजला जात असता ट्रेनमध्ये धक्का लागला, त्यावरून काही प्रवाशांशी त्याचा जोरदार वाद झाला होता. या वादाने टोक गाठलं ते थेट हिंदी-मराठी भाषिक वादापर्यंत पर्यंत पोहोचल. या वादातून चार ते पाच जणांनी अर्णव खैरे याला बेदम मारहाण देखील केली होती. या मारहाणी नंतर अर्णव मानसिक तणावात गेला आणि मानसिक तणावात असणाऱ्या अर्णव खैरे यांनी राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली.

काय म्हणले अर्णवचे वडील-
अर्णवचे वडील जितेंद्र खैरे यांनी याबाबत अधिक सांगितले आहे की, अर्णव ट्रेनमधून कॉलेजला जात होता. ट्रेनमध्ये धक्का लागल्याने त्याने हिंदीतून समोरच्या व्यक्तीला पुढे सरकण्यास सांगितलं होते. यावेळी एका प्रवाशाने थेट अर्णवच्या कानाखाली मारली. तुला मराठीतून बोलता येत नाही का? मराठी बोलायला लाज वाटते का? माझा मुलगा घाबरत घाबरत मला झालेला प्रकार सांगत होता. असे त्याच्या वडिलांनी सांगितले.

ट्रेनमध्ये असलेल्या प्रवाशांच्या एका ग्रुपने अर्णव जोरदार मारहाण तर केलीच शिवाय त्याला धमकावलं देखील होतं. अर्णवला मुलुंडला उतरायचं असूनदेखील तो ठाण्याला उतरला. कारण त्याला भांडण अधिक वाढवायचं नव्हतं, असं त्याच्या वडिलांना सांगितलं.

पुढे ते म्हणतात माझा मुलगा तर गेला, मात्र असे प्रकार पुढे होऊ नयेत. भाषेवरून वाद होऊ नये, असं जितेंद्र खैरे यांनी म्हटलं आहे. जितेंद्र खैरे यांच्या तक्रारी वरून कोळसेवाडी पोलिसांनी यासंदर्भात गुन्हा दाखल करून घेतला आहे. पोलिसांनी या संधर्भात अधिक तपास सुरू केला आहे.

हे देखील वाचा –

WhatsApp Data Leaked : व्हॉट्सअ‍ॅप वापरताय तर सावधान! ३.५ अब्ज यूजर्सचा डेटा धोक्यात

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या