Home / मनोरंजन / Kantara : कांतारा चॅप्टर 1 च्या निर्मात्यांने केल चाहत्यांना आवाहन; म्हणाला त्यांच्या भावना दुखावल्या जातील

Kantara : कांतारा चॅप्टर 1 च्या निर्मात्यांने केल चाहत्यांना आवाहन; म्हणाला त्यांच्या भावना दुखावल्या जातील

Kantara : अभिनेता रिषभ शेट्टी याचा ‘कांतारा: चॅप्टर 1’ (Kantara: Chapter 1) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर(Box office) चांगलाच धुमाकूळ घालत...

By: Team Navakal
Kantara: Chapter-1

Kantara : अभिनेता रिषभ शेट्टी याचा ‘कांतारा: चॅप्टर 1’ (Kantara: Chapter 1) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर(Box office) चांगलाच धुमाकूळ घालत आहे. सोशल मीडियावरही चाहत्यांकडून या चित्रपटाला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. मात्र, या उत्साहाच्या भरात काही चाहते दैवी पात्रांची नक्कल करत आहेत. चित्रपटाच्या निर्मात्यांनी म्हणजेच होम्बले फिल्म्सने एक अधिकृत निवेदन जारी केलं आहे. ते म्हणतात सार्वजनिक ठिकाणी असे कृत्य करू नये असे विनम्र अभिवादन त्यांनी चाहत्यांना केले आहे.

होम्बले फिल्म्सने यांच्या एक्स (X) अकाउंटवर हे निवेदन शेअर केले गेले आहे. तुलूनाडूच्या तटीय क्षेत्रातील ‘धैवा आराधना’ ही श्रद्धा आणि सांस्कृतिक गौरवाचे मोठे प्रतीक मानले जाते. ‘कांतारा’ आणि ‘कांतारा: चॅप्टर 1’ या चित्रपटात या देव देवतानावरील भक्तीचे सन्मानपूर्वक चित्रण करण्यासाठी आणि देव-देवतांच्या महिमेचा उत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने बनवले आहेत.

‘धैवा आराधना’बद्दलचा अटूट आदर राखला जाईल, याची खबरदारी त्यांनी घेतली आहे आणि तुलू मातीचे महत्त्व आणि वारसा जगापर्यंत यशस्वीरित्या पोहोचवला आहे . निर्मात्यांनी चाहत्यांकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल कृतज्ञतासुद्धा व्यक्त केली आहे. मात्र, त्याचबरोबर त्यांनी एका गंभीर समस्येला वाचा देखील फोडली आहे.  सार्वजनिक ठिकाणी नक्कल करणे अयोग्य असल्याचं ते सांगतात.

या चित्रपटात दाखवलेली देव पूजा ही खोल आध्यात्मिक परंपरेत रुजली गेलेली आहे आणि ती केवळ एक पात्र साकारणे नाही. असे कृत्य आपल्या श्रद्धेला कमी लेखण्यासारखे आहे. त्यामुळे तेथील लोकांच्या श्रद्धेला ठेच पोहोचेल.

पुढे ते असेही म्हणले की, सिनेमा हॉलमध्ये असो किंवा सार्वजनिक ठिकाणी, दैवी पात्रांची नक्कल करणे किंवा त्यांची अवहेलना करणे समाविष्ट असलेल्या कोणत्याही कृत्यापासून दूर राहावे.


हे देखील वाचा –

MPSC Group C Recruitment 2025: ‘एमपीएससी’ची ९३८ जागांसाठी भरती सरू; हि असेल अर्ज भरण्याची तारीख..

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या