Kartiki Ekadashi 2025 : हिंदू धर्मांत सणांना प्रचंड महत्व असत. म्हणूनच भारतात प्रत्येक सण मोठ्या उत्सहात साजरा केला जातो. त्यामुळे आज कार्तिकी एकादशी देखील मोठ्या उत्सहात साजरी केली जात आहे. आज कार्तिकी एकादशीच्या महासोहळ्याला हजारो भक्तांचा जनसागर पवित्र स्नान करण्यासाठी भल्या पहाटेपासून चंद्रभागेच्या तीरावर जमला होता. कार्तिकी एकादशीचे पवित्र स्नान करून या सोहळ्याला भाविकांनी पवित्र अशी सुरुवात केली आहे. तस बघायला गेलं तर वर्षभरात २४ एकादशी येतात, त्यापैकी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या शुभ दिवशी उपास करून देवांची आराधना केली जाते.
कार्तिकी एकादशी –
कार्तिकी एकादशीला भगवंत एकादशी असे देखील म्हटले जाते. शाश्त्रानुसार २ नोव्हेंबर रोजी कार्तिकी तथा प्रबोधिनी एकादशीचे व्रताचरण केले पाहिजे. याच तारखेपासून तुलसी विवाहानंतर शुभ कार्याला सुरवात होते. यावर्षी २ ते ५ नोव्हेंबर अर्थात त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत तुलसी विवाह करता येईल.
एकादशीचे व्रत करण्याचे नियम-
एक दिवस अगोदरपासूनच एकादशीचे व्रत सुरू होते असे बोलले जाते आणि दुसऱ्या दिवशी पारण केल्यानंतर ते पूर्ण होते. या दिवशी सात्विक आहार करावा. म्हणजे आदल्यादिवशी संध्याकाळपासूनच तामसिक भोजन पूर्णपणे वर्जित करावे. दशमीदिवशी सूर्यास्तापूर्वी भोजन करावे. त्यानंतर एकादशी दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावे. हातात पाणी आणि अक्षता घेऊन संकल्प करावा.
घरात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना करावी. देवाला गंगाजलाचा अभिषेक घालावा. देवाला चंदन, हळद, कुंकू, लावावे तसेच तुळशीची पाने देखील अर्पण करावीत. तुळशीची पाने अर्पण करणे हे अनिवार्य मानले जाते. ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ या मंत्राचा जप देखील करावा. तसेच कार्तिकी एकादशीची पूर्ण कथा वाचावी किंवा ऐकावी. संध्याकाळच्या वेळी पुन्हा देवाची पूजा करावी आणि तुपाचा दिवा देखील लावावा. शिवाय या दिवशी पाणी पिऊन किंवा फलाहार करून उपवास करावा. दिवसभर देवाचे स्मरण करावे. द्वादशी तिथीला उपवास सोडावा. उपवास सोडताना प्रथम तुलसीचे पान खाऊन नंतर साधे भोजन करावा.
हे देखील वाचा – Nitesh Rane On Sanjay Raut : नितेश राणेंची संजय राऊतांसाठी भावनिक पोस्ट..









