Kishori Pednekar : मुंबई महानगरपालिकेच्या राजकारणात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील संघर्ष आता सोशल मीडियाच्या माध्यमातून रंजक वळणावर पोहोचला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या नवनियुक्त विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केला आहे. हा व्हिडिओ सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला असून, त्यावर देशपांडे यांनी दिलेल्या मिश्कील कॅप्शनमुळे नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे.
“नया है यह, पण सिरीयस आहे”
संदीप देशपांडे यांनी हा व्हिडिओ पोस्ट करताना अत्यंत तिरकस आणि मिश्कील टिप्पणी केली आहे. त्यांनी आपल्या कॅप्शनमध्ये “नया है यह, पण सिरीयस आहे” (हे नवीन आहेत, पण गंभीर आहेत) असे म्हटले आहे. किशोरी पेडणेकर यांनी नुकताच मुंबई महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा पदभार स्वीकारला असून, त्यांच्या कार्यपद्धतीवर आणि वक्तव्यांवर मनसेने या माध्यमातून उपरोधिक निशाणा साधला आहे. हा व्हिडिओ आणि त्यावरील ही टिप्पणी काही वेळातच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे.
नया है यह पण सिरिअस आहे pic.twitter.com/ZKIgzXnhBv
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) February 16, 2026
कोस्टल रोडवरील आवाजावरून तक्रार
या व्हायरल व्हिडिओमध्ये किशोरी पेडणेकर हिंदी वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना दिसत आहेत. मुंबईतील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोड’ वरून प्रवास करताना निर्माण होणाऱ्या आवाजाबाबत (Noise issues) त्या तक्रार करत आहेत. कोस्टल रोडच्या बोगद्यातून किंवा मार्गावरून जाताना वाहनांचा जो आवाज येतो, त्या तांत्रिक बाबीवर त्या आपली मते मांडत आहेत. मात्र, त्यांची बोलण्याची धाटणी आणि मांडलेला मुद्दा यावरून विरोधकांनी त्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे.
राजकीय वातावरण तापले
मुंबई महानगरपालिकेत प्रथमच महिला विरोधी पक्षनेता म्हणून किशोरी पेडणेकर यांची नियुक्ती झाली आहे. एकीकडे त्या सत्ताधाऱ्यांवर आक्रमकपणे तुटून पडत असताना, दुसरीकडे मनसे आणि इतर राजकीय पक्षांकडून त्यांच्या वैयक्तिक आणि राजकीय प्रतिमेवर अशा प्रकारे टीकास्त्र सोडले जात आहे. कोस्टल रोड हा मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा विषय असल्याने, त्यावरील तांत्रिक त्रुटी काढणे हे विरोधकांचे काम असले, तरी मांडणी करण्याच्या पद्धतीवरून हा व्हिडिओ आता विनोदाचा आणि चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.
पेडणेकर व्हिडिओत म्हणतात की हमें भी मिलना चाहिए। देखो एक तो कोस्टल रोड, मैं ना ये बात कहेंगी जब भी कोस्टल में आप घुसते हैं तो दोनों बाजू से हवा का एकदम ये बन जाता है और बहुत करके अपने को आवाज आता है। थोड़ी विंडो नीचे करो, देखो आवाज तो वो मुझे कैसे सुना देगा? उससे और ज्यादा रहता है। मीन्स ऐसे इसमें पैसा बर्बाद करना और कोई भी कॉन्ट्रैक्टर आकर कहता है और डिजाइन बना ये बना, ये नहीं होना चाहिए। देखो आप जाओ ना वो रोड से विंडो नीचे करो, सुनने को आते हैं क्या देखो? नहीं, मैं अभी नहीं बोलेगी। मैं।










