Home / महाराष्ट्र / Kishori Pednekar : निवडणूक तोंडावर पेडणेकर अडचणीत? प्रतिज्ञापत्रातील माहिती लपवल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप

Kishori Pednekar : निवडणूक तोंडावर पेडणेकर अडचणीत? प्रतिज्ञापत्रातील माहिती लपवल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप

Kishori Pednekar : मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता असल्याची माहिती समोर आली...

By: Team Navakal
Kishori Pednekar
Social + WhatsApp CTA

Kishori Pednekar : मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता असल्याची माहिती समोर आली आहे. पेडणेकर यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात गुन्ह्यांची माहिती लपवून निवडणूक आयोगाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा धक्कादायक आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला. याप्रकरणी सोमय्या यांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेत पेडणेकरांवर कडक कारवाई करा अशी मागणी देखील केली आहे.

किरीट सोमय्या यांचा नेमका आरोप काय?
किरीट सोमय्या यांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोरी पेडणेकर यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्यावर दाखल असलेल्या फौजदारी गुन्ह्यांची माहिती अद्यापही उघड केलेली नाही. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, उमेदवाराला आपल्यावर असलेल्या सर्व गुन्ह्यांची माहिती देणे बंधनकारक असते परंतु पेडणेकर यांनी ही माहिती जाणीवपूर्वक लपउन ठेवली आहे, हा मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रकार असल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे.

“कोविड काळात बॉडी बॅग कथित घोटाळा केल्याप्रकरणी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात किशोरी पेडणेकरां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तरवरळीतील गोमाता जनता एसआरए सोसायटीमधील झोपडपट्टीवासीयांचे गाळे बळकावल्याच्या आरोपावरून निर्मल नगर पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा नोंदवला गेला होता. किशोरी पेडणेकर यांनी ही सर्व माहिती दडवून निवडणूक आयोगाची फसवणूक केल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला होत. याप्रकरणी मी पुराव्यानिशी तक्रार दिली असून, आता त्यांची चौकशी होणार आणि त्यांच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई देखील होणार,” असा विश्वास आता किरीट सोमय्या यांनी व्यक्त केला आहे.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांनी हा मुद्दा लावून धरल्याने मुंबईच्या राजकारणात मोठी खळबळ उडाल्याचे दिसून येत आहे. या आरोपांवर आता किशोरी पेडणेकर किंवा ठाकरे गटाकडून काय उत्तर येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या