Kitchen Tips : दिवाळीचा (Diwali) फराळ केल्यानंतर तो काही काळातच नरम पडतो. फराळ दीर्घकाळापर्यंत(long time) टिकून राहावा यासाठी आपण बरेच प्रयत्न सुद्धा करतो पण या प्रयत्नांत यश काही मिळत नाही. आणि दिवाळी म्हटलं की चकल्या, करंज्या, लाडू, शंकरपाळे हे पदार्थ आवर्जून केले जातात.
या पदार्थांची चव दीर्घकाळापर्यंत टिकून राहावी यासाठी महिला कमालीची मेहेनत देखील घेतात. पण काहींना त्यात यश मिळत नाही. पण यावर हे काही घरगुती उपाय करून पहा..

फराळ बनवताना फराळाचे साहित्य हे पूर्णपणे कोरडे असावे. पोहे, रवा, बेसन आणि खोबरे हे धुवून नीट उन्हात वाळवून घयावे .फराळ बनवत असताना हात पूर्णपणे कोरडे असावेत. त्यामुळं बुरशी किंवा ओलसरपणा येत नाही.
फराळ बनवण्यासाठी योग्य तेलाची आणि ताज्या तेलाची निवड करा. चांगल्या तेलामुळं पदार्थ बरेच दिवस टिकून राहण्यास मदत होते. एका पदार्थासाठी वापरलेले तेल दुसऱ्या पदार्थासाठी सहसा वापरू नका.

फराळाचा पदार्थ तळल्यानंतर तो पूर्णपणे थंड करुन मगच डब्यात भरावा. गरम गरम पदार्थ डब्यात भरल्यास ते नरम पडण्याची दाट शक्यता असते. साठवणीसाठी निवडलेले डबे हे स्वच्छच असावेत. एअरटाइट स्टील किंवा काचेचे डबे हे पदार्थ ठेवण्यासाठी वापरावेत. प्लास्टिकच्या डब्यामुळं पदार्थाची चव हि बिघडते. बंद डब्यातला फराळ काढताना देखील कोरड्या हातांनीच काढावा.
हे देखील वाचा – Asrani Passes Away : असरानी यांच्या पार्थिवर रात्री घाईत का अंत्यसंस्कार केले गेले?