Kolhapuri Chappal GI Tag- कोल्हापुरी चप्पलला ‘जीआय टॅग’ स्वामित्व दोन महामंडळांकडे !

Kolhapuri Chappal Secures GI Tag

मुंबई – कोल्हापूर शहराच्या प्रमुख आकर्षणापैकी एक असलेली कोल्हापुरी चप्पल (iconic Kolhapuri chappal)सध्या चर्चेत आहे.याच महाराष्ट्र व कर्नाटकातील पारंपरिक आणि ऐतिहासिक पादत्राणास जीआय टॅग (Geographical Indication (GI) tag)म्हणजेच भौगोलिक संकेतचिन्ह मिळाले आहे.या जीआय टॅगचे अधिकृत नोंदणीकृत स्वामित्व संत रोहिदास लेदर इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड चर्मकार डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (Charmakar Development Corporation Limited)आणि डॉ.बाबू जगजीवनराम लेदर इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (Babu Jagjivan Ram Leather Industries) या दोन महामंडळाकडेच आहे,असे या दोन्ही महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी स्पष्ट केले आहे.

दोन महिन्यापूर्वी इटलीच्या प्रसिद्ध ‘प्राडा’ (luxury fashion brand Prada)कंपनीने एका फॅशन शोमध्ये कोल्हापुरी चप्पल झळकावली होती.एका मॉडेलने परिधान केलेल्या लेदर सँडल्सचे डिझाइन हुबेहुब महाराष्ट्रातील पारंपरिक आणि जीआय नोंदणीकृत कोल्हापुरी चप्पलप्रमाणे होते.या घटनेनंतर सोशल मीडिया आणि कोल्हापुरातील कारागिरांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

त्यानंतर वकिलांच्या एका गटाने ‘जीआय टॅग’ अर्थात भौगोलिक संकेतचिन्हाने संरक्षित असलेल्या कोल्हापुरी चपले सारखे डिझाइन वापरून कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल प्राडाला आव्हान देणारी एक जनहित याचिका(Public Interest Litigation)मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court,)दाखल केली होती. त्यावेळी खंडपीठाने ही जनहित याचिका फेटाळून लावताना असा निर्णय दिला की, अशा बाबींसाठी फक्त कोल्हापुरी चपलेच्या ‘जीआय टॅग’ चे नोंदणीकृत धारक म्हणजेच महाराष्ट्र आणि कर्नाटक चर्मोद्योग विकास महामंडळे ही प्रत्यक्ष भागधारक असल्याने त्यांनाच अशा प्रकारची दिवाणी कारवाई करण्याचा कायदेशीर अधिकार आहे.या पार्श्वभूमीवर, लिडकॉम आणि लिडकर या महामंडळाने कोल्हापुरी ग्लोबल जीआय टॅगच्या अधिकृत नोंदणीकृत मालक असून त्यांनी संयुक्तपणे आपली भूमिका स्पष्ट केली आहे की, ‘प्राडा’ किंवा तत्सम आंतरराष्ट्रीय संस्थांशी कोणत्याही प्रकारचे संवाद, चर्चा किंवा प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार इतर कोणत्याही व्यक्ती अथवा संस्थेला नाही.