Home / महाराष्ट्र / konkani-language :आता पोस्टमन भरतीसाठी कोकणी भाषा येण बंधनकारक; गोवा सरकारचा मोठा निर्णय

konkani-language :आता पोस्टमन भरतीसाठी कोकणी भाषा येण बंधनकारक; गोवा सरकारचा मोठा निर्णय

konkani-language: गोव्यामध्ये आता पोस्टमन (ग्रामिण डाक सेवक – GDS) होण्यासाठी कोकणी भाषा येणे बंधनकारक आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी...

By: Team Navakal
konkani-language

konkani-language: गोव्यामध्ये आता पोस्टमन (ग्रामिण डाक सेवक – GDS) होण्यासाठी कोकणी भाषा येणे बंधनकारक आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ही महत्त्वाची घोषणा केली आहे. केंद्र सरकारच्या दळणवळण मंत्रालयाच्या अखत्यारीतील पोस्ट(POST) विभागाने या संदर्भातील नियमात बदल केला आहे. या बदलामुळे गोव्यातील स्थानिक तरुणांना याचा अधिक लाभ होणार आहे.

याआधी गोव्यात पोस्टमन म्हणून महाराष्ट्रातील तरुणांची भरती होत होती. यावर स्थानिक आमदार आणि विरोधी पक्षांनी बरेच आक्षेप घेतला होता. गोव्यातील तरुणांच्या रोजगारावर याचा देखील परिणाम होत होता. या सगळ्यात तक्रारींना मध्य ठेवत सरकारने हा निर्णय घेतला आहे.

नवीन नियम काय आहेत?

मुख्यमंत्री सांगतात, गोवा प्रदेशाचे पोस्ट सेवा संचालक रमेश पाटील यांच्याशी चर्चा केली. या चर्चेत GDS भरतीसाठीच्या नियमांमध्ये बदल करण्यास पोस्ट विभागाने मंजुरी दिल्याची माहिती समोर आहे. या नवीन धोरणानुसार, गोव्यात GDS पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना कोकणी भाषा येणे हे बंधनकारक असेल. कोकणी आणि मराठी या दोन्ही भाषांना या भरती प्रक्रियेत अधिकृतपणे स्थानिक भाषा म्हणून मान्यता देखील मिळाली आहे.याचा अर्थ असा कि ज्या उमेदवारांनी दहावीपर्यंत कोकणी किंवा मराठी माध्यमात शिक्षण घेतले आहे, त्यांना प्राधान्य देण्यात येईल. या बदलामुळे गोव्याच्या तरुणांना प्राधान्य मिळेल. यामुळे स्थानिक तरुणांसाठी नोकरीच्या समाधी उपलब्ध होतील.

अगदी सोप्प्या भाषेत सांगायचं झालं तर  गोव्यात पोस्टाची नोकरी हवी असेल तर कोकणी येन अनिवार्य आहे. जरी तुम्ही मराठीत शिकला असाल, तरीही तुम्हाला कोकणी येणे आवश्यक आहे.



हे देखील वाचा –

Special-Buses: दिवाळीसाठी पुण्यातून यंदा ५८९ विशेष बसची व्यवस्था; १५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत सोडण्यात येणार

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या