Home / महाराष्ट्र / Kunal Kamra & Sushma Andhare: कुणाल कामरा, सुषमा अंधारे हक्कभंग समितीसमोर हजर राहणार

Kunal Kamra & Sushma Andhare: कुणाल कामरा, सुषमा अंधारे हक्कभंग समितीसमोर हजर राहणार

Kunal Kamra & Sushma Andhare – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांच्याबद्दल अवमानकारक टिप्पणी केल्याबद्दल महाराष्ट्र विधीमंडळ हक्कभंग समितीने...

By: Team Navakal
Kunal Kamra & Sushma Andhare
Social + WhatsApp CTA

Kunal Kamra & Sushma Andhare – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांच्याबद्दल अवमानकारक टिप्पणी केल्याबद्दल महाराष्ट्र विधीमंडळ हक्कभंग समितीने कुणाल कामरा (Kunal Kamra) आणि उबाठाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांना समन्स जारी केले असून उद्या हजर रहावे लागणार आहे.

भाजपा आमदार प्रसाद लाड या समितीचे अध्यक्ष असून त्यांनी सांगितले की, कामरा आणि अंधारे यांना १५ दिवसांपूर्वी नोटीस पाठवण्यात आली असून उद्या दुपारी २ वाजेपर्यंत समितीसमोर उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. जर दोनवेळा समन्स पाठवूनही ते आले नाहीत तर त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल. मार्च २०२५ मध्ये कुणाल कामरा याने एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक व्हिडीओ पोस्ट केला होता तर उबाठाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे यांच्याबद्दल अपमानास्पद भाषा वापरली होती. त्यामुळे या दोघांना विधीमंडळ हक्कभंग समितीला समोरे जावे लागत असून तिथे म्हणणे मांडावे लागणार आहे.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या