Ladki Bahin Yojana eKYC: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या योजनेतील सर्व पात्र महिला लाभार्थ्यांना आता ई-केवायसी (eKYC) करणे बंधनकारक असणार आहे.
अपात्र लाभार्थ्यांची वाढती संख्या पाहता सरकारने हे पाऊल उचलले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या योजनेचा लाभ घेणाऱ्या 2.52 कोटी लाभार्थ्यांपैकी सुमारे 27 ते 28 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत. विशेष म्हणजे, यात 14,298 पुरुषांनीही योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे.
Ladki Bahin Yojana eKYC का आहे बंधनकारक?
या योजनेत अनेक गैरव्यवहार समोर आले होते. यात शासकीय महिला कर्मचारी, अडीच लाखांहून अधिक उत्पन्न असलेल्या महिला तसेच एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिलांनी योजनेचा लाभ घेतल्याचे दिसून आले.
त्यामुळे, गरजू आणि पात्र महिलांच्याच खात्यात पैसे जमा व्हावेत यासाठी आता आधार कायद्यातील तरतुदींनुसार ई-केवायसीच्या माध्यमातून लाभार्थ्यांची पडताळणी केली जाणार आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ट्वीट करून ही प्रक्रिया अत्यंत सोपी असल्याचे सांगितले.
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) September 18, 2025
Ladki Bahin Yojana eKYC कधीपर्यंत करणे आवश्यक?
शासनाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, सर्व लाभार्थी भगिनींना आजपासून पुढील 2 महिन्यांच्या आत ही ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. जे लाभार्थी या कालावधीत आधार प्रमाणीकरण (Aadhaar authentication) करणार नाहीत, ते पुढील हप्त्यासाठी अपात्र ठरतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच, भविष्यात दरवर्षी जून महिन्यात ही प्रक्रिया 2 महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करणे आवश्यक असेल.
E-KYC करण्याची सोपी प्रक्रिया (Ladki Bahin Yojana eKYC process)
लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी प्रक्रिया https://ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत वेब पोर्टलवर सुरू करण्यात आली आहे.
- सर्वप्रथम या वेबसाइटवर जाऊन eKYC Banner वर क्लिक करा.
- तुमचा आधार क्रमांक टाकून तो प्रमाणित करा. तुमच्या आधार-लिंक केलेल्या मोबाईलवर एक OTP (one time password) येईल, तो टाका.
- पुढील टप्प्यात, तुम्हाला तुमच्या पतीचा किंवा वडिलांचा आधार क्रमांक भरून त्यांचेही प्रमाणीकरण करावे लागेल.
- त्यानंतर तुम्हाला एक घोषणापत्र भरावे लागेल. यामध्ये तुम्ही कोणत्याही सरकारी नोकरीत नसल्याचे आणि तुमच्या कुटुंबातील फक्त दोन (एक विवाहित आणि एक अविवाहित) महिला या योजनेचा लाभ घेत असल्याचे नमूद करावे लागेल.
- हा अर्ज भरल्यानंतर तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल.
E-KYC न केल्यास काय होईल?
ज्या लाभार्थ्यांनी निर्धारित वेळेत ई-केवायसी पूर्ण केले नाही, त्यांना या योजनेचा पुढील हप्ता मिळणार नाही. त्यामुळे, वेळेत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन सरकारतर्फे करण्यात आले आहे.
हे देखील वाचा – अदानी समूहाला ‘क्लीन चिट’; हिंडेनबर्गचे सर्व आरोप SEBI ने फेटाळले, गौतम अदानी म्हणाले…