Home / महाराष्ट्र / Ladki Bahin Yojana : पुरुषांना लाभ आणि 26 लाख बोगस लाभार्थी आरोप; ‘लाडकी बहीण’ योजनेत गोंधळ उघड! अपात्रांकडून वसुली सुरू

Ladki Bahin Yojana : पुरुषांना लाभ आणि 26 लाख बोगस लाभार्थी आरोप; ‘लाडकी बहीण’ योजनेत गोंधळ उघड! अपात्रांकडून वसुली सुरू

Ladki Bahin Yojana : विधानमंडळात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेवरून विरोधकांनी तीव्र गदारोळ घातला. या योजनेत सुमारे 26 लाख बोगस...

By: Team Navakal
Ladki Bahin Yojana
Social + WhatsApp CTA

Ladki Bahin Yojana : विधानमंडळात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेवरून विरोधकांनी तीव्र गदारोळ घातला. या योजनेत सुमारे 26 लाख बोगस लाभार्थी असून, त्यामुळे सुमारे 5,136 कोटी 30 लाख रुपयांचा मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याचा गंभीर आरोप विरोधकांनी केला.

यावर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सविस्तर उत्तर देत शासनाची भूमिका स्पष्ट केली. अपात्र लाभार्थ्यांकडून घेतलेल्या रकमेची थेट वसुली प्रक्रिया सुरू असून ती पुढील दोन महिन्यांत पूर्ण होईल, असे आश्वासन मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.

मंत्र्यांनी दिली गैरव्यवहाराची कबुली आणि स्पष्टीकरण

मंत्री आदिती तटकरे यांनी विधानमंडळात योजनेची आकडेवारी सादर केली आणि गैरव्यवहारावर स्पष्टीकरण दिले.

प्राप्त अर्ज: योजनेसाठी एकूण 2 कोटी 63 लाख 83 हजार 589 अर्ज प्राप्त झाले होते, त्यापैकी 2 कोटी 43 लाख 82 हजार 936 अर्ज पात्र ठरले.

26 लाख अर्जांचे सत्य: ज्या 26 लाख बोगस लाभार्थ्यांचा उल्लेख झाला, ती आकडेवारी माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून फेरपडताळणीसाठी प्राप्त झाली होती. मंत्री म्हणाल्या की, 26 लाख अर्जांच्या डेटाचे क्रॉस-व्हेरिफिकेशन करताना केवळ 4 लाख अर्जांच्या पुनर्पडताळणीची आवश्यकता आढळली, उर्वरित सर्व अर्ज पात्र होते.

डेटा वापर: लाभार्थ्यांच्या सखोल पडताळणीसाठी कृषी विभागाकडील नमो शेतकरी योजना, अन्न व नागरी पुरवठा विभाग आणि शालेय शिक्षण विभागाकडील डेटाचा वापर करण्यात आला.

पुरुषांची बँक खाती आणि शासकीय कर्मचारी

गैरव्यवहारावर उत्तर देताना मंत्री आदिती तटकरे यांनी काही पुरुष आणि सरकारी कर्मचाऱ्यांनी योजनेचा लाभ घेतल्याची कबुली दिली.

सरकारी कर्मचारी: लाभ घेण्यास अपात्र असलेले सुमारे 8 हजार शासकीय कर्मचारी (मुख्यतः आरोग्य व इतर सरकारी यंत्रणांमधील) यांनी घेतलेल्या रकमेची वसुली प्रक्रिया मागील 5 ते 6 महिन्यांपासून सुरू आहे आणि पुढील दोन महिन्यांत पूर्ण होईल.

पुरुषांची खाती: साधारणपणे 12 ते 14 हजार महिलांच्या नावावर त्यांच्या घरातील पुरुष (वडील, भाऊ किंवा पती) यांची बँक खाती जोडलेली असल्याचे पडताळणीत दिसून आले. अनेक महिलांची वैयक्तिक खाती नसल्यामुळे त्यांनी घरातील पुरुषांची खाती दिली होती.

विरोधकांचे गंभीर आरोप आणि उपमुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर

या योजनेतील कथित गैरव्यवहाराचे स्वरूप विरोधी पक्षाचे नेते सुनील प्रभू यांनी जिल्हानिहाय आकडेवारी सादर करत उघड केले. “सरकारच्या पडताळणीत सुमारे 14,998 पुरुषांनी महिलांच्या नावाने 1,500 रुपयांप्रमाणे 10 महिन्यांपर्यंत लाभ घेतला आहे. या गैरव्यवहार करणाऱ्या पुरुषांवर आणि यादीत नावे समाविष्ट करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी,” अशी मागणी त्यांनी केली. पुण्यात 2 लाख 4 हजार, ठाण्यात 1 लाख 35 हजार 300, नाशिकमध्ये 1 लाख 86 हजार 800 बोगस लाभार्थी असल्याचा दावाही त्यांनी केला.

यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट विरोधकांवर हल्लाबोल केला. “योजनेला फसवी घोषणा ठरवण्याचे आणि योजना बंद व्हावी म्हणून न्यायालयाची पायरी चढण्याचे काम विरोधकांनीच केले. आज कोणत्या तोंडाने ‘लाडक्या बहिणीं’चा मुद्दा उपस्थित करता,” असा प्रश्न शिंदे यांनी विचारला. तसेच ही योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

हे देखील वाचा – Goa Nightclub Fire : नाईटक्लब आगीत जळत असताना लुथरा बंधूंनी थायलंडचे तिकीट बुक केले! अटकेपासून वाचण्यासाठी आरोपींचा कारनामा

Web Title:
संबंधित बातम्या