Lakshmi Pujan 2025: दिवाळी (Diwali) म्हटलं कि प्रकाशचा सण. नात्याला मायेचा सण. या दिवसामध्ये वातावरण एक वेगळीच चकाकी येते. दर वर्षी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पण दरवर्षीच लक्ष्मीपूजन(Lakshmi Pujan)कधी करावे या बाबतचा संभ्रम पाहायला मिळतो. तसाच संभ्रम यावेळी देखील पाहायला मिळाला आहे.
दिवाळी, ज्याला दिव्यांचा उत्सव मानले जाते, हा भारतीय संस्कृतीतील एक महत्वाचा सण आहे. या दिवशी देवी लक्ष्मीची मनोभावे पूजा केली जाते. दिवाळी अमावस्येला येते, ज्या दिवशी आकाशात चंद्र दिसत नाही आणि अंधारच असतो. या अंधारात घरांमध्ये दिवे लावून देवी लक्ष्मीच स्वागत केलं जात. ज्योतिषशास्त्रानुसार, देवी लक्ष्मीही प्रकाशाचे प्रतीक म्हणून ओळखली जाते. यंदा मात्र २०आणि २१ऑक्टोबर दोन्ही दिवशी येणाऱ्या अमावस्या तिथीमुळे सगळ्यांमध्येच संभ्रम असल्याचं दिसून येत आहे.
यंदाचं लक्ष्मीपूजन 20 की 21 ऑक्टोबरला होणार?
यंदा दिवाळीत लक्ष्मी-कुबेरपूजन शास्त्र नियमाप्रमाणे मंगळवार २१ ऑक्टोबर रोजी करावे असे आवाहन पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी केले आहे. लक्ष्मीपूजन हे कार्तिक महिन्याच्या अमावस्येच्या दिवशी दरवर्षी केले जेते. यंदा कार्तिक अमावस्या २० ऑक्टोबर रोजी दुपारी ३:४५ वाजता सुरू होऊन २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५:५५ वाजता संपणार आहे. मागील ६३ वर्षांत चौथ्यांनंदा असा संभ्रम निर्माण झाला.
दा. कृ. सोमण यांनी सांगितले की, धर्मसिंधू, पुरुषार्थ चिंतामणी, तिथीनिर्णय इत्यादी ग्रंथात म्हटल्याप्रमाणे पूर्व दिवशी प्रदोषव्याप्ती असून दुसरे दिवशी तीन प्रहरांपेक्षा अधिक अमावास्या व्याप्ती असणार आहे. अमावास्येपेक्षा प्रतिपदा अधिक काळ असल्यास लक्ष्मीपूजन दुसऱ्या दिवशी म्हणजे अमावास्येच्याच दिवशी केले तरी चालेल.
हे देखील वाचा –