Home / महाराष्ट्र / Leopard Attack: बिबट्याच्या बछड्याच्या हल्ल्यात तिघेजण जखमी; बिबट्याच्या बछड्याने केला हल्ला..

Leopard Attack: बिबट्याच्या बछड्याच्या हल्ल्यात तिघेजण जखमी; बिबट्याच्या बछड्याने केला हल्ला..

Leopard Attack: कोल्हापुरातील पन्हाळगडाच्या पायथ्याशी नर बिबट्याच्या हल्ल्यात एका बिबट्याच्या मादी बछड्याचा मृत्यू झाला होता. आता त्याच कुटुंबातील दुसरा बछडा...

By: Team Navakal
Leopard Attack

Leopard Attack: कोल्हापुरातील पन्हाळगडाच्या पायथ्याशी नर बिबट्याच्या हल्ल्यात एका बिबट्याच्या मादी बछड्याचा मृत्यू झाला होता. आता त्याच कुटुंबातील दुसरा बछडा बिथरल्याने परिसरात भीतीच वातावरण आहे. गुरुवारपासून या बछड्याने गावात धुमाकूळ घातला आहे. या बछड्यामुळे गावात भीतीच वातावरण आहे. गुरुवारपासून या बछड्याने पाच ते सहाजणांवर हल्ल्याचा प्रयत्न केला आहे. यातील तीन जणांची प्रकृती सध्या गंभीर आहे.  वाढत्या धोक्याची पार्श्वभूमी लक्षात घेता वन विभागाने तातडीने ड्रोनद्वारे शोध मोहीम सुरू केली आहे.

दोन दिवसांपूर्वी आपटी पैकी सोमवार पेठेत भरवस्तीत बछड्याचा मृतदेह आढळला होता. बिबट्याने केलेल्या हल्ल्यादरम्यान हा मादी बछडा बळी पडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. या हल्ल्यात बिबट्याचे कुटुंब विखुरले गेले आणि वेगळा झालेला दुसरा बछडा बिथरला. या सगळ्या प्रकारामुळे त्याने गावातील नागरिकांवर हल्ले केले. गुरुवारी रात्री बादेवाडी येथील दोघा-तिघांवर या बछड्याने हल्ला केला.  शुक्रवारी सकाळी गणपती मंदिराजवळ देखील त्याने तिघांवर हल्ला केला या सतत घडणाऱ्या प्रकरणामुळे गावात भीतीचे वातावरण आहे. वन विभाग तातडीने बचाव मोहीम सुरु करत बिबट्याचा शोध ड्रोनच्या सहाय्याने घेत आहेत. याचबरोबर परिसरात गस्त वाढवण्यात आली असून बिबट्याच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. आक्रमक झालेल्या बछड्यापासून सावध राहण्यासाठीचे आवाहन जंगल अभ्यासकांनी केल आहे.


हे देखील वाचा –

Film Haq: हक चित्रपट वादाच्या भोवऱ्यात; परवानगीशिवाय बनवला चित्रपट..

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या