Home / महाराष्ट्र / Leopard News : जुन्नरचे १०० बिबटे होणार वनताराला स्थलांतरीत; संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून बिबट्या थेट भाईंदरमध्ये..

Leopard News : जुन्नरचे १०० बिबटे होणार वनताराला स्थलांतरीत; संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून बिबट्या थेट भाईंदरमध्ये..

Leopard News : जुन्नर परिसरातील बिबट्यांच्या वाढत्या संख्येमुळे मानव–वन्यजीव संघर्ष वाढला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने महत्त्वाचा...

By: Team Navakal
Leopard
Social + WhatsApp CTA

Leopard News : जुन्नर परिसरातील बिबट्यांच्या वाढत्या संख्येमुळे मानव–वन्यजीव संघर्ष वाढला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने महत्त्वाचा निर्णय घेतला. जुन्नर वन विभागातील बिबट्यांच्या ५० जोड्यांना म्हणजे १०० बिबट्यांना गुजरातमधील जामनगर येथील अनंत अंबानी यांच्या वनतारा रेस्क्यू आणि रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये स्थलांतरित करण्यास मंजुरी दिल्याची माहिती प्राधिकरणाचे सचिव अभिषेक चौधरी यांनी दिली.
अभिषेक चौधरी यांनी सांगितले की, वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ च्या कलम ३८-आय (२) अंतर्गत ही मंजुरी देण्यात आली आहे. याबाबत महाराष्ट्राच्या मुख्य वन्यजीव रक्षकांच्या नागपूर येथील कार्यालयाला अधिकृत पत्र पाठवले आहे. या पत्रात स्थलांतरासाठी आवश्यक काही महत्त्वाच्या अटी नमूद केल्या आहेत.

जामनगर येथील वनतारा सुविधेमधील प्राण्यांच्या निवाऱ्यासाठी वन्यजीव संरक्षण अधिनियमाच्या कलम १२ (ब) अंतर्गत आवश्यक परवानग्या घेतल्या आहेत की नाही, याची खात्री करण्याची जबाबदारी राज्याच्या मुख्य वन्यजीव रक्षकांवर सोपवण्यात आली आहे. त्याचबरोबर प्राणी संपादन आणि हस्तांतरणाशी संबंधित सर्व नियम व अटींचे काटेकोर पालन करून त्याचा अहवाल सादर करणे बंधनकारक आहे.

राज्यातील बिबट्यांची वाढती संख्या हि चिंताजनक आहे. ग्रामीण भागात बिबट्यांचा वावर हा होताच त्याचबरोबर आता शहरात देखील बिबट्यांचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे. बिबट्याच्या हल्यात मृत्यूला बळी पडणाऱ्यांची संख्या देखील अधिक आहे. त्यामुळे प्रशासन या मुद्द्यावर सक्रिय असल्याचे दिसून येत आहे. मानव आणि वन्यजीव यांमधील संघर्ष दिवसागणिक वाढत चालला आहे.

या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने यावर एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जुन्नर वन विभागातील बिबट्यांच्या ५० जोड्यांना म्हणजेच १०० बिबट्यांना गुजरातमधील जामनगर येथील अनंत अंबानी यांच्या वनतारा रेस्क्यू आणि रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये स्थलांतरित करण्यास मंजुरी मिळाल्याची माहिती प्राधिकरणाचे सचिव अभिषेक चौधरी यांनी दिली आहे.

अभिषेक चौधरी यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ च्या कलम ३८-आय (२) अंतर्गत ही मंजुरी देण्यात आली असून याबाबत महाराष्ट्राच्या मुख्य वन्यजीव रक्षकांच्या नागपूर येथील कार्यालयाला अधिकृत पत्र पाठवण्यात आले आहे. या पत्रात स्थलांतरासाठी आवश्यक काही महत्त्वाच्या अटी देखील नमूद करण्यात आल्या आहेत.

जामनगर येथील वनतारा सुविधेमधील प्राण्यांच्या निवाऱ्यासाठी वन्यजीव संरक्षण अधिनियमाच्या कलम १२ (ब) अंतर्गत आवश्यक परवानग्या घेतल्या आहेत की नाही, याची खात्री करण्याची जबाबदारी राज्याच्या मुख्य वन्यजीव रक्षकांवर सोपवली गेली आहे. त्याचबरोबर प्राणी संपादन आणि हस्तांतरणाशी संबंधित सर्व नियम आणि अटींचे काटेकोर पालन करून त्याचा अहवाल सादर करणे बंधनकारक असणार आहे.

या सगळ्यांबरोबरच शहरी वस्तीत देखील या बिबट्यांचा मोठा वावर आहे. काल भाईंदर पूर्वेतील स्वामीनारायण मंदिर परिसरातील पारिजात इमारतीत सकाळी सुमारे सातच्या सुमारास हा बिबट्या दिसून आला आणि एकच खळबळ माजली. इमारतीच्या आवारात अचानक बिबट्या दिसून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तर, लोकांची गर्दी आणि आरडाओरड यामुळे बिथरलेल्या बिबट्या लपण्यासाठी जवळील एका घरात शिरला. त्यावेळी घरात असलेल्या चार जणांवर त्याने हल्ला केला असून यात एकाच घरातील ४ जण गंभीर जखमी झाले.

त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या वन विभागाने बिबट्याला ताब्यात घेण्यासाठी मोठी मोहीम हाती घेतली होती. या कारवाईस तब्ब्ल चार तास लागले. अखेर दुपारी बेशुद्ध करणाऱ्या इंजेक्शनचा वापर करून बिबट्याला ताब्यात घेतले.

एवढ्या जास्त लोकवस्तीचा परिसर असून देखील, शिवाय आजूबाजूला कुठेही जंगल नाही. असे असतानाही स्वामीनारायण मंदिर परिसरात बिबट्या आढळल्याने स्थानिक नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला होता. प्रामुख्याने आता हा बिबट्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून आल्याचा अंदाज वन विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

हे देखील वाचा – Prithviraj Chavan : एपस्टीन सेक्स स्कँडलवर पृथ्वीराज चव्हाणांचे महत्वपूर्ण दावे..

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या