Home / महाराष्ट्र / Leopards Sterilization : बिबट्यांच्या हल्ल्यावर निघणार तोडगा; बिबट्यांच्या नसबंदीचे आदेश

Leopards Sterilization : बिबट्यांच्या हल्ल्यावर निघणार तोडगा; बिबट्यांच्या नसबंदीचे आदेश

Leopards Sterilization : बिबट्यांची (Leopards )वाढती लोकसंख्या आणि मनुष्य यांच्यातल कमी होणार अंतर अत्यतं धोकादायक आहे. पुणे (pune)जिल्ह्यातील जुन्नर,आंबेगाव, शिरूर...

By: Team Navakal
Leopards Sterilization

Leopards Sterilization : बिबट्यांची (Leopards )वाढती लोकसंख्या आणि मनुष्य यांच्यातल कमी होणार अंतर अत्यतं धोकादायक आहे. पुणे (pune)जिल्ह्यातील जुन्नर,आंबेगाव, शिरूर आणि खेड तालुक्यांत बिबट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या बिबट्यांची नसबंदी (Leopards Sterilization) करण्यात येणार असल्याचं देखील बोललं जातंय. या संदर्भातील प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविण्यात येणार आहे. त्याशिवाय बिबट्यांना बंदिस्त करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून साहित्य खरेदीसाठी चाळीस कोटी रुपयांचा निधी देण्यास मान्यता देखील देण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात ‌‘दिशा कृषी उन्नतीची‌’ या विषयावर आयोजित बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलताना त्यांनी हि माहिती दिली.

जिल्ह्यातील चार तालुक्यांतील बिबट्यांची संख्या झपाट्याने वाढत असून वन्यप्राणी आणि मानव संघर्ष वाढत चलला आहे. गेल्या वर्षभरात जिल्ह्यात १६जणांचे मृत्यू झाले असल्याची माहिती आहे. त्यामुळे यावर उपाययोजना करण्यासंदर्भात माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी अजित पवार यांना बैठक घेण्याची विनंती देखील केली होती. त्यानुसार ही बैठक झाल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

चारही तालुक्यांत शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती देखील अजित पवारांनी दिली. त्यासाठी महावितरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी लोकेश चंद्रा यांच्याशी संपर्क साधून यासंदर्भात त्यांना सूचना देखील करण्यात आली आहे. त्यासाठी लागणारी उपकरणे लागणार असून शिवाय ३१ ऑक्टोबरपर्यंत ह्या सर्व प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

बैठकीत बिबट्यांच्या वाढत्या संख्येवर चिंता व्यक्त केली गेली. तसेच उपाययोजनांवर चर्चा करताना थेट केंद्रीय पर्यावरण आणि वनमंत्री भूपेंद्र यादव यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क देखील साधला गेला. जिल्ह्यात चार तालुक्यांतील बिबट्यांच्या वाढत्या संख्येची माहिती यादव यांच्या निदर्शनास आणून दिली गेली. त्यावेळी यादव यांनी नसबंदी करण्यासंदर्भात प्रस्ताव पाठविण्याची सूचना देखील केली. तसेच गुजरात राज्यातील वनतारा प्रकल्पाअंतर्गत जवळपास पन्नास बिबटे पाठविण्यात येणार असल्याचे पवार यांनी सांगितले.


हे देखील वाचा Hair Care Tips : कोरफड केसांवर थेट लावू शकतो का?

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या