Home / महाराष्ट्र / Lifeguard : मुंबईच्या समुद्र किनार्‍यांवरील जीवरक्षकांची संख्या वाढणार

Lifeguard : मुंबईच्या समुद्र किनार्‍यांवरील जीवरक्षकांची संख्या वाढणार

Lifeguard – मुंबईतील (Mumbai Beach) समुद्र किनारी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी महापालिका प्रशासनाने (Brihanmumbai Municipal Corporation)समुद्रकिनाऱ्यांवर जीवरक्षकांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला...

By: Team Navakal
Lifeguard

Lifeguard – मुंबईतील (Mumbai Beach) समुद्र किनारी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी महापालिका प्रशासनाने (Brihanmumbai Municipal Corporation)समुद्रकिनाऱ्यांवर जीवरक्षकांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. समुद्रात बुडण्याच्या घटना रोखण्यासाठी पालिका नवीन ४४ जीव रक्षक (44 additional lifeguards)नेमणार आहे. यासंदर्भात निविदा मागवल्या असून पुढील तीन वर्षांसाठी खासगी एजन्सीला हे काम दिले जाणार आहे.

सध्या पालिकेतर्फे ९३ जीवरक्षक तैनात आहेत. त्यात आता ४४ नवीन जीव रक्षकांचा समावेश केला जाणार आहे. यामुळे सध्याच्या कर्मचाऱ्यांवरील कामाचा भार कमी होणार आहे. सुमारे १४५ किलो मीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेल्या मुंबईच्या समुद्राचे १२ किनारे (12 beaches)नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहेत. त्यापैकी गिरगाव (Girgaon), दादर (Dadar), जुहू, वर्सोवा (Versova), गोराई (Gorai) आणि अक्सा (Aksa)या सहा किनाऱ्यांवर सातत्याने बुडण्याच्या घटना घडतात. त्यामुळे ते असुरक्षित बनले आहेत. अशा ठिकाणी जीवरक्षक तैनात करणे आवश्यक आहे.

चालू वर्षाच्या सुरुवातीला जुहू समुद्रकिनाऱ्यावर (Juhu Beach)दोन किशोरवयीन मुलांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. गेल्या वर्षीही जुहू समुद्रकिनाऱ्यावर आठ जणांना समुद्रात बुडून आपला जीव गमवावा लागला होता. २०२३ मध्येही यापैकी सहा समुद्रकिनाऱ्यांवर बुडण्याच्या अनेक घटना घडल्या होत्या. त्यामुळे अतिरिक्त जीवरक्षकांची नियुक्ती करण्यासाठी पालिकेने एका खाजगी एजन्सीची नियुक्ती करण्यासाठी निविदा काढली आहे. ही एजन्सी ३ वर्षांच्या कालावधीसाठी मनुष्यबळ पुरवण्याची जबाबदारी घेईल. जीवरक्षकांसोबतच जेट स्की, बोटी, बोय आणि ट्यूब पुरवण्याची जबाबदारीही याच संस्थेला देण्यात येणार आहे.


हे देखील वाचा –

SBI Report : पुढील वर्षापर्यंत महागाई खुपच कमी राहाणार !स्टेट बँकेचा अहवाल

 दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदेंचा महिलांना मोठा शब्द; ‘लाडकी बहीण योजने’बद्दल म्हणाले…

ओला दुष्काळ’च्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना आव्हान; फडणवीसांचे 2020 चे थेट पत्रच दाखवले

Web Title:
संबंधित बातम्या