Home / महाराष्ट्र / Lodha seeks gas for Jain temples: जैन मंदिरांना गॅस द्या! मंगलप्रभात लोढांचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री भुजबळांना पत्र

Lodha seeks gas for Jain temples: जैन मंदिरांना गॅस द्या! मंगलप्रभात लोढांचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री भुजबळांना पत्र

Lodha seeks gas for Jain temples – राज्यात सुरू असलेल्या एलपीजी टंचाईच्या पार्श्वभूमीवर जैन समाजाच्या आयंबील सणासाठी मंदिरांना गॅस पुरवठा...

By: Team Navakal
Lodha seeks gas for Jain temples
Social + WhatsApp CTA

Lodha seeks gas for Jain temples – राज्यात सुरू असलेल्या एलपीजी टंचाईच्या पार्श्वभूमीवर जैन समाजाच्या आयंबील सणासाठी मंदिरांना गॅस पुरवठा करण्याची मागणी केल्यामुळे राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मलबार हिल विधानसभा मतदारसंघातील १६ जैन मंदिरांना प्रत्येकी पाच गॅस सिलिंडर उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी त्यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना पत्राद्वारे केली आहे.

आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे इंधनपुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. इस्रायल–अमेरिका आणि इराणमधील तणावामुळे होर्मुझ सामुद्रधुनीतून होणाऱ्या जहाजांच्या वाहतुकीत अडथळे निर्माण झाले आहेत. त्याचा थेट परिणाम भारताच्या एलपीजी व एलएनजी पुरवठ्यावर झाला असून, मुंबईसारख्या आर्थिक राजधानीत गॅस टंचाई तीव्र होत आहे. घरगुती ग्राहकांसह हॉटेल, लहान उद्योग आणि व्यावसायिकांनाही या संकटाचा मोठा फटका बसत आहे.

अशा परिस्थितीत लोढा यांनी आयंबील सणाच्या पार्श्वभूमीवर जैन मंदिरांना प्राधान्याने गॅस पुरवठा करण्याची मागणी केल्याने विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. लोढा यांनी यापूर्वीही जैन संघटनांना पत्र लिहून, तुम्हाला गॅसची कमतरता भासल्यास कळवा, ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करेन, असे आश्वासन दिले होते. त्यालाही काही जणांनी विरोध केला होता. राज्यात सर्वसामान्य नागरिकांनाही गॅस मिळवण्यासाठी रांगा लावाव्या लागत असताना, केवळ एका समाजासाठी अशी विशेष मागणी केल्याने हा मुद्दा अधिकच तापला आहे.

सध्या मुंबईसह राज्यातील अनेक भागांत गॅस टंचाईची समस्या गंभीर बनली असून, लहान-मोठ्या व्यवसायांनाही त्याचा फटका बसत आहे. मात्र लोढांकडून केवळ जैन मंदिरांसाठी गॅस पुरवठ्याचा मुद्दा पुढे आल्याने विरोधकांकडून त्यावर टीका होत आहे. मंत्री सर्वसामान्यांचे आहेत की विशिष्ट समाजाचे? असा सवाल उपस्थित केला जात असून, राज्य सरकार या प्रश्नावर कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आयंबील म्हणजे काय?

चैत्र महिन्यात साजरा केला जाणारा ओली आयंबील हा जैन धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा धार्मिक उत्सव मानला जातो. या काळात श्रद्धाळू उपवास, पूजा आणि विविध धार्मिक विधी मोठ्या भक्तिभावाने पार पाडतात. आयंबील’ म्हणजे अत्यंत साधा, संयमी आणि नियमबद्ध आहार घेण्याची धार्मिक पद्धत होय. या दिवशी मसाले, तूप, दूध यांसारख्या चव वाढवणाऱ्या पदार्थांचा त्याग करून अतिशय साधे अन्न एकदाच ग्रहण केले जाते. या उत्सवानिमित्त जैन मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणावर ‘आंबील’ हे पारंपरिक पेय तयार करून भक्तांना दिले जाते. त्यामुळे मंदिरांमध्ये स्वयंपाकाची मोठी व्यवस्था केली जाते.

मलबार हिल विधानसभा मतदारसंघातील १६ जैन मंदिरांमध्ये “ओली (आयंबील)” निमित्त मोठ्या प्रमाणावर तयारी केली जाते. या व्यवस्थेसाठी प्रत्येक मंदिराला सुमारे ५ गॅस सिलिंडरची आवश्यकता भासते. त्यामुळे या सर्व मंदिरांना प्रत्येकी ५ गॅस सिलिंडर उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी संबंधित पत्रातून करण्यात आली आहे.

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या