Home / महाराष्ट्र / Maha Kumbh Mela 2026 : कुंभमेळ्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाचे तगडे नियोजन; रेल्वे सुरक्षा दलाचे ३ हजार जवान तैनात

Maha Kumbh Mela 2026 : कुंभमेळ्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाचे तगडे नियोजन; रेल्वे सुरक्षा दलाचे ३ हजार जवान तैनात

Maha Kumbh Mela 2026 : नाशिक येथे होणाऱ्या आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनानेही तयारीला वेग आला असून, भाविकांच्या सुरक्षित प्रवासासाठी...

By: Team Navakal
Maha Kumbh Mela 2025
Social + WhatsApp CTA

Maha Kumbh Mela 2026 : नाशिक येथे होणाऱ्या आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनानेही तयारीला वेग आला असून, भाविकांच्या सुरक्षित प्रवासासाठी विविध पातळ्यांवर नियोजन करण्यात येत आहे. लाखो भाविकांची गर्दी लक्षात घेता कोणतीही अप्रिय घटना घडू नये, यासाठी रेल्वे सुरक्षा दलाकडून दक्षतेने उपाययोजना राबवण्यात येत आहेत.

कुंभमेळ्याच्या कालावधीत रेल्वे स्थानकांवर तसेच रेल्वे मार्गांवर वाढीव सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात येणार आहे. संशयास्पद हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी आधुनिक साधनसामग्रीचा वापर करण्यात येणार असून, गर्दीचे नियमन आणि आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी विशेष पथके सज्ज ठेवण्यात येणार आहेत.

या संदर्भात भुसावळ विभागाचे कमांडंट चंद्रमोहन मिश्र यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी दिलेल्या माहितीनुसार लोहमार्ग पोलीस, रेल्वे सुरक्षा दल तसेच नाशिक शहर पोलीस यांच्यात समन्वय साधून कुंभमेळ्याची संपूर्ण सुरक्षा व्यवस्था उभारण्यात येणार आहे. संयुक्तपणे करण्यात येणाऱ्या या सुरक्षायोजनांमुळे भाविकांना सुरक्षित व सुकर प्रवासाचा अनुभव मिळेल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

नाशिक येथे होणाऱ्या आगामी कुंभमेळ्यासाठी बहुतांश भाविक रेल्वे मार्गानेच प्रवास करतील, असा अंदाज रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन नियमित रेल्वे गाड्यांबरोबरच विशेष रेल्वे गाड्यांचीही व्यवस्था करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

रेल्वे प्रशासनाच्या अंदाजानुसार नाशिककडे येणाऱ्या नियमित गाड्या तसेच कुंभमेळ्यासाठी सुरू करण्यात येणाऱ्या विशेष गाड्यांच्या माध्यमातून दररोज सुमारे ७५ हजार ते एक लाख भाविक नाशिक रेल्वेस्थानकावर दाखल होणार आहेत. त्यामुळे स्थानक परिसरात गर्दीचे योग्य नियोजन, प्रवाशांच्या हालचाली सुरळीत ठेवणे तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने विशेष उपाययोजना राबविण्यात येणार आहेत.

दरम्यान, राज्य शासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार कुंभमेळ्याच्या कालावधीत दररोज दोन लाखांपर्यंत भाविक नाशिकमध्ये येण्याची शक्यता आहे. यामध्ये रेल्वे, रस्ते वाहतूक आणि इतर माध्यमांचा समावेश असणार असून, या मोठ्या प्रमाणातील गर्दीला सामोरे जाण्यासाठी प्रशासनाकडून विविध यंत्रणांमध्ये समन्वय साधला जात आहे.

भाविकांचा प्रवास सुलभ व सुरक्षित व्हावा यासाठी रेल्वे प्रशासन, जिल्हा प्रशासन आणि पोलिस यंत्रणा संयुक्तपणे नियोजन करीत असून, येत्या काळात विशेष गाड्यांचे वेळापत्रक तसेच प्रवाशांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.

नाशिक कुंभमेळ्यासाठी रेल्वे सुरक्षा व्यवस्था बळकट, भाविकांच्या सुरक्षिततेसाठी खास नियोजन
नाशिक कुंभमेळ्यासाठी रेल्वे मार्गावरून येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी मध्यरेल्वेच्या भुसावळ विभागाने व्यापक तयारी सुरू केली आहे. भुसावळ, जळगाव, मनमाड, शिर्डी, कोपरगाव, ओढा, नाशिक व देवळाली रेल्वे स्थानकांवर विशेष सुरक्षा उपाययोजना करण्यात येणार असून, प्रत्येक स्टेशनवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे नियोजन केले गेले आहे. विशेषतः नाशिक रेल्वे स्थानकावर १२० उच्च क्षमतेचे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत, आणि काम अंतिम टप्प्यात आहे.

रेल्वे सुरक्षा दलामध्ये एकूण १४४८ जवान असून, त्यात ३५० महिला आहेत. यासोबतच ७०० लोहमार्ग पोलिस कर्मचारी तैनात केले जात आहेत, ज्यात १०० महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. कुंभमेळ्याच्या सुरुवातीपूर्वी आरपीएफ, नाशिक पोलिस व लोहमार्ग पोलिस यांचा १५ दिवसांचा आपत्कालीन परिस्थीतीशी सामना करण्याचा सराव देखील होणार आहे.

तत्काळ सहाय्यता पथक व आपत्ती व्यवस्थापन पथक असे दोन विशेष पथके २४ तास सतर्क राहणार असून, मेडिकल पथक तसेच स्काऊट-गाईडच्या पथकाचे विशेष सहकार्यही घेण्यात येणार आहे.

नाशिक कुंभमेळ्यासाठी स्टेशनवर तगडा बंदोबस्त – ऐतिहासिक सुरक्षा तयारी
नाशिक कुंभमेळ्यासाठी रेल्वे सुरक्षा व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. २००३ च्या कुंभमेळ्याच्या तुलनेत यावेळी नाशिक स्थानकावर भाविकांच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक सुविधा आणि मनुष्यबळ तैनात केले गेले आहे.

मागील वेळी फक्त २०० आरपीएफ जवान होते, तर यावेळी १४४८ जवान व ७०० लोहमार्ग पोलिस तैनात राहणार आहेत. मागील वेळी सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते, तर यावेळी १२० उच्च क्षमतेचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जात आहेत.

सुरक्षेसाठी डोअर फेम मेटल डिटेक्टरची संख्या मागील ५ वरून २० करण्यात आली आहे. संवाद सुविधांसाठी व्हीएचएफ सेट्स पाच आणि वॉकी टॉकी १०० उपलब्ध असतील, जे मागीलवेळी अनुक्रमे एक आणि २० होते.

कुंभमेळ्यात बॅरिकेट्स नव्हत्या, तर आता २०० बॅरिकेट्स तैनात करण्यात येणार आहेत. सुरक्षा निरीक्षणासाठी सहा वॉच टॉवर्स तयार केले आहेत. त्याचबरोबर, आतंकी हल्ला किंवा तत्सम अपघातांवर तत्काळ प्रतिक्रिया देण्यासाठी शस्त्रधारी दहा मोर्चा उभारण्यात येणार आहेत.

या सर्व उपाययोजनांमुळे भाविकांचे सुगम आणि सुरक्षित आगमन सुनिश्चित केले जाईल, तसेच कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला प्रभावी प्रतिसाद देता येईल.

पोलिस व रेल्वे सुरक्षा बलाचे तगडे समन्वय-
नाशिक कुंभमेळ्याच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा बल, नाशिक पोलिस व लोहमार्ग पोलिसांमध्ये अत्यंत काटेकोर समन्वय साधण्यात आला आहे. भुसावळ विभागाचे कमांडंट अधिकारी चंद्रमोहन मिश्र, नाशिक पोलिस कमिशनर एस. जगन्नाथ व लोहमार्ग पोलिस, नागपूरचे पोलिस अधीक्षक अनंत रोकडे यांनी एकत्र येऊन सर्व स्तरावर विचारविनिमय करत कुंभमेळ्याच्या सुरक्षेचे नियोजन पूर्ण केले आहे.

गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी सहा वॉच टॉवर, १०० वॉकी-टॉकी संच, ४० मेगाफोन, १६ श्वान पथके, १० अतिरिक्त वाहने, ६० हॅण्ड होल्ड मेटल डिटेक्टर आणि २० डोअर फेम मेटल डिटेक्टर अशा प्रचंड उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

रेल्वे सुरक्षा बलाचे कमांडंट चंद्रमोहन मिश्र यांनी सांगितले की, “अलाहाबादच्या कुंभमेळ्यातील गोंधळामुळे वित्त आणि मनुष्यहानी झाली होती. त्या घटनेचा सखोल अभ्यास करून नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी भाविकांचे आगमन सुरळीत आणि सुरक्षित करण्यासाठी सर्व प्रकारच्या उपाययोजना राबवल्या आहेत.”

ही सुरक्षा व्यवस्था गर्दी नियंत्रित करण्यासाठी तसेच कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी आखण्यात आली आहे, ज्यामुळे भाविकांचा अनुभव सुरक्षित आणि सुव्यवस्थित राहील.

हे देखील वाचा – Heart Blockage Symptoms : हार्ट अटॅकचा धोका टाळायचा असेल तर ‘या’ 5 लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका; वेळीच सावध व्हा!

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या