Mahabaleshwar weather : राज्यात थंडीचा कडाका वाढल्याचे दिसून येत आहे. राज्याच्या विविध भागात थंडीचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. त्याचप्रमाणे सातारा जिल्ह्यात काल थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वरचा पारा १३.२ अंश तर सातारचा पारा १६.६ अंशावर आहे.
सातारा जिल्ह्यात मागच्या दोन दिवसांपासून थंडीची मोठी लाट निर्माण झाली आहे. शुक्रवारी तर दिवसभर ढगाळ वातावरण असल्याचे दिसले. दिवसभर वातावरणात मोठा गारठा जाणवत होता. थंडीमुळे पहाटेच्यावेळी फेरफटका मारायला जाणाऱ्या नागरिकांची गर्दी कमी झाली आहे. वाढत्या थंडीमुळे तापमानातील चढ – उतार कायम आहे. थंड हवेचे ठिकाण समजल्या जाणाऱ्या महाबळेश्वरचा किमान पारा काल १३.२ अंश तर कमाल पारा २४.५अंश इतका होता तर सातारचे किमान पारा १६. ६ अंश तर कमाल पारा २९.०२ अंशावर होता.
वाढत्या थंडीमुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागासह शहरी भागात चौकाचौकात शेकोट्या पेटवल्या जात आहेत. थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपड्यांना बाजारपेठेत मोठी मागणी वाढल्याचे देखील दिसून येत आहे. मोती चौक, राजवाडा, राजपथ, जि.प. मैदान परिसर, पोवईनाका, खणआळी परिसरात उबदार कपडे खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी वाढू लागली आहे. थंडीची तीव्रता गेल्या काही दिवसांमध्ये कमी-अधिक प्रमाणात वाढू लागली आहे.
हे देखील वाचा –









