महादेव मुंडे हत्या प्रकरणात बाळा बांगरांची ६ तास चौकशी

Bala Vijaysinh Bangar

बीड – बीडच्या परळीतील व्यापारी महादेव मुंडे (Mahadev Munde murder)यांची परळीत तहसील कार्यालय परिसरात २० ऑक्टोबर २०२३ रोजी हत्या करण्यात आली होती.या हत्येमागे मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील (Santosh Deshmukh case)मुख्य आरोपी वाल्मिक कराडच्या (Valmik Karad)रक्ताच्या नात्यातील व्यक्तीचा हात असल्याचा दावा कराडचा जुना सहकारी विजयसिंह (बाळा) बांगर (Bala Vijaysinh Bangar)याने केला. यानंतर केज पोलिसांनी बाळा बांगरांची ६ तास चौकशी केली.

दोन दिवसांपूर्वी विजयसिंह बाळा बांगरने पाटोदा येथे पत्रकार परिषद (press conference )घेत आरोप केला की महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा सहभाग आहे. पोलीस आणि शासकीय यंत्रणा त्याच्या पाठीशी आहे. कोणत्याही आर्थिक व्यवहारातून ही हत्या झाली नाही. कराडच्या स्वाभिमान दुखावला गेला म्हणून ही हत्या करण्यात आली. कराडने ज्या मुलांना पाठवले त्यांना मुंडेच्या शरीराचा तुकडा काढून आणण्यास सांगितले होते. त्याच्या आदेशानुसार मानेचा तुकडा काढून आणण्यात आला आणि तो वाल्मिकला दाखवण्यात आला. माझ्याकडे या प्रकरणातील सर्व माहिती आहे. तक्रार आणि खुलासा करायला तयार असल्याचे त्याने यावेळी सांगितले. या आरोपानंतर महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे (wife Dnyaneshwari Munde)यांनी पोलिसांकडे बाळा बांगर यांचा जबाब नोंदवण्याची मागणी केली होती. त्यानुसार केज पोलिसांनी बांगरची तब्बल सहा तास चौकशी केली व त्याचा जबाब (statement )नोंदवला.