Home / महाराष्ट्र / Mahadev Munde Case: ‘वाल्मिक कराडच्या मुलांपासून आम्हाला धोका’; महादेव मुंडेंच्या पत्नीची थेट एसपींकडे धाव

Mahadev Munde Case: ‘वाल्मिक कराडच्या मुलांपासून आम्हाला धोका’; महादेव मुंडेंच्या पत्नीची थेट एसपींकडे धाव

Mahadev Munde Case: बीड जिल्ह्यातील परळी येथील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले आहे. या प्रकरणाचा...

By: Team Navakal
Mahadev Munde Case
Social + WhatsApp CTA

Mahadev Munde Case: बीड जिल्ह्यातील परळी येथील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच, मुंडे यांच्या कुटुंबावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आपल्या मुलांच्या आणि कुटुंबाच्या जीविताला धोका असल्याचे सांगत बीडच्या पोलीस अधीक्षकांना लेखी तक्रार दिली आहे.

वाल्मिक कराडच्या मुलांवर गंभीर आरोप

महादेव मुंडे यांच्या हत्येचा आरोप सध्या तुरुंगात असलेल्या वाल्मिक कराडवर आहे. मात्र, ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आता वाल्मिकची दोन मुलेसुशील कराड आणि गणेश कराड यांच्यापासून आपल्या परिवाराला धोका असल्याचे म्हटले आहे. तक्रार अर्जानुसार, दत्तात्रय मुंडे, अशोक मुंडे, सतीश फड आणि भगवान फड यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.

मुलांना मारहाणीचा प्रयत्न आणि सोशल मीडियाचा संदर्भ

ज्ञानेश्वरी मुंडे यांनी एका घटनेचा उल्लेख करताना सांगितले की, “19 फेब्रुवारी रोजी माझे दोन्ही मुले घरी परतत असताना त्यांना वाल्मिक कराडचा समर्थक असलेल्या ‘बाल्या’ नावाच्या तरुणाने शिवीगाळ करून मारहाण करण्याचा प्रयत्न केला. या तरुणाच्या सोशल मीडिया अकाउंटवर वाल्मिक कराडचे स्टेटस दिसून येतात. उद्या माझ्या मुलांना काही झाले, तर त्याला कराडची मुले आणि पोलीस प्रशासन जबाबदार असेल.”

सुप्रिया सुळे करणार मुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार

या प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक असलेला गोट्या गित्ते अद्याप फरार असून, त्याच्याकडूनही धोका असल्याचे मुंडे यांनी नमूद केले आहे. या गंभीर प्रकरणाची दखल खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली असून, त्या लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून पोलीस संरक्षणाची मागणी करणार असल्याची माहिती ज्ञानेश्वरी मुंडे यांनी दिली आहे.

या हत्येच्या तपासात आतापर्यंत वाल्मिक कराडच्या घरी काम करणाऱ्या दोघांची नार्को टेस्ट करण्यात आली आहे. अशातच कुटुंबाने केलेल्या या तक्रारीमुळे परळीतील राजकीय आणि सामाजिक वातावरण पुन्हा तापले आहे.

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या