Home / महाराष्ट्र / Maharashtra Election 2025 : राज्यात निवडणुकीच्या पार्शवभूमीवर विविध भागात राडा

Maharashtra Election 2025 : राज्यात निवडणुकीच्या पार्शवभूमीवर विविध भागात राडा

Maharashtra Election 2025 : राज्यात सर्वत्र निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच काही ठिकाणी मात्र राजकीय वातावरण मात्र कमालीचं तापलेले दिसत आहे....

By: Team Navakal
Maharashtra Election 2025
Social + WhatsApp CTA

Maharashtra Election 2025 : राज्यात सर्वत्र निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच काही ठिकाणी मात्र राजकीय वातावरण मात्र कमालीचं तापलेले दिसत आहे. बरीच जिल्ह्यात निवडणुकीवरून दोन गटात राडे बाचाबाची देखील पाहायला मिळत आहेत. कोणकोणत्या जिल्ह्यात निवडणुकीच्या पार्शवभूमीवर वातावरण कलुषित झाले आहे याची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे.

१. बदलापुरात भाजपा-शिंदेसेना कार्यकर्ते आमने -सामने
ठाणे जिल्ह्यात आणि बदलापूरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून वाद सुरू आहे.आज मतदानाच्या दिवशीदेखील भाजापा आणि शिंदेंच्य शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा होता होता टळला. बदलापूर पश्चिम येथील गांधीनगर टेकडी , बस स्टँडजवळ आज शिंदेंच्या शिवसेनेचे आणि भाजपाचे कार्यकर्त आमने-सामने आहे. याप्रसंगी दोन्ही बाजुचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते.एकमेकाच्या अंगावर धावून जात मोठ मोठ्याने घोषणाबाजी करत होते.प्रकरण अगदी हातघाईवर आले असतानाच नेमके पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोन्ही बाजुच्या कार्यकर्त्यांना पांगवले.त्यामुळे राडा होता होता टळला.

२. खासदार रक्षा खडसेंची पोलिसांशी बाचाबाची
मुक्ताईनगर शहरात भाजपाच्या उमेदवाराला मतदान केंद्रात प्रवेश करताना पोलिसांनी रोखल्याने भाजपाच्या रावेरच्या खासदार, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे कमालिच्या संतापल्या. इतर उमेदवारांना मतदान केंद्रात प्रवेश करताना तुम्ही अडवत नाही,मग फक्त आमच्याच उमेदवाराला का अडवता,असा सवाल करत रक्षा खडसे यांनी पोलिसांशी हुज्जत घातली. या प्रकारामुळे मतदान केंद्रात काही काळ तणाव निर्माण झाला होता.

३. बदलापुरात भाजपा-शिंदेसेना कार्यकर्ते आमने -सामने
ठाणे जिल्ह्यात आणि बदलापूरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून शिंदेंची शिवसेना आणि भाजपामध्ये वाद सुरू आहे.आज मतदानाच्या दिवशीदेखील भाजापा आणि शिंदेंच्य शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला. भाजपा उमेदवार रमेश सोळसे यांच्या मुलाला बदलापूर पोलीस ठाण्याच्या बाहेर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर भाजपाचे कार्यकर्तेदेखील आक्रमक झाले.याप्रसंगी तुफान हाणामारी झाली. पोलिसांनी सौम्य लाठीमार करत जमावाला पांगवले. त्याआधी सकाळी बदलापूर पश्चिम येथील गांधीनगर टेकडी , बस स्टँडजवळ आज शिंदेंच्या शिवसेनेचे आणि भाजपाचे कार्यकर्त आमने-सामने आले होते. याप्रसंगी दोन्ही बाजुचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते.एकमेकाच्या अंगावर धावून जात मोठ मोठ्याने घोषणाबाजी करत होते.प्रकरण अगदी हातघाईवर आले असतानाच नेमके पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोन्ही बाजुच्या कार्यकर्त्यांना पांगवले.त्यामुळे राडा होता होता टळला.

४. चिपळूणमध्ये बूथ लावण्यावरून काँग्रेस – शरद पवार गटात वाद
चिपळूणच्या गोवळकोट परिसरात मतदानादरम्यान काँग्रेस आणि शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाद निर्माण झाला. बूथ लावण्याच्या मुद्द्यावरून दोन गट आमने-सामने येताच परिसरात तणावाचे वातावरण तयार झाले. १०० मीटरच्या आत बूथ लावल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी शरद पवार गटाच्या उमेदवारावर केला. या आरोपावरून दोन्ही पक्षांमध्ये शाब्दिक चकमक झाली आणि राड्याची परिस्थिती निर्माण झाली. घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन मोठा फौजफाटा गोवळकोट येथे तैनात करण्यात आला. काँग्रेसच्या आरोपानुसार नियम मोडून शरद पवार गटाच्या उमेदवाराने प्रतिबंधित परिघात बूथ उभारल्यामुळेच हा वाद विकोपाला गेला.

५. उमेदवार आणि पोलिसांत त्र्यंबकेश्वरमध्ये बाचाबाची
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर नगरपरिषद निवडणुकीत आज मतदानादरम्यान एका मतदान केंद्रावर मोठा गोंधळ झाला. नुतन त्र्यंबक विद्यालय मतदान केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळ उमेदवारांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. मतदार मतदानासाठी दाखल होत असताना समर्थकांकडून मतदार आमच्याकडे लक्ष राहू द्या असा आग्रह केला जात असल्याचे माहिती आहे. यावेळी पोलिसांनी समर्थकांना गर्दी न करण्याचे आणि मतदान प्रक्रियेत हस्तक्षेप टाळण्याचे निर्देश दिले. मात्र समर्थकांनी पोलिसांचे ऐकण्यास नकार देत त्यांच्याशी वाद घातला. त्यातून उमेदवार व पोलिस यांच्यात बाचाबाची झाली आणि काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस दल घटनास्थळी दाखल झाले.

६. मुक्ताईनगररात कट्टर विरोधक आमने-सामने
मुक्ताईनगर नगरपरिषद निवडणुकीत आज मतदानादरम्यान दोन कट्टर विरोधक थेट एकमेकांसमोर आले. शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील आणि वरिष्ठ नेते एकनाथ खडसे मतदारांच्या भेटीगाठीसाठी फिरत असताना त्यांची वाहने आमने–सामने येताच परिसरात काही काळ तणाव आणि गोंधळ निर्माण झाला. घटनेनंतर एकनाथ खडसे म्हणाले की, आमदार मला ओव्हरटेक करून पुढे गेले. गुंडगिरी आमदारांची वाढली आहे. आमदार चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले की, खडसेंना माझी हवा सहन होत नाही. ओव्हरटेक करणे हा कायद्याचा भंग आहे का? गावात राहू नका, असे म्हणायचे का? रस्ता अडवून गुंडगिरी ते करत आहेत. अशी टीका आता चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.


हे देखील वाचा – Raigad Shivsena Vs NCP Rada : महाड नगरपरिषद निवडणुकीत भयंकर राडा; महाडमध्ये तणावाची परिस्थिती

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या