Home / महाराष्ट्र / Maharashtra Election : महाराष्ट्रात मतदानाची टक्केवारी किती?

Maharashtra Election : महाराष्ट्रात मतदानाची टक्केवारी किती?

Maharashtra Election : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आज विविध ठिकाणी मतदान पार पडत आहे. या निमित्ताने मतदारांमध्ये मोठा उत्साह...

By: Team Navakal
Maharashtra Election
Social + WhatsApp CTA

Maharashtra Election : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आज विविध ठिकाणी मतदान पार पडत आहे. या निमित्ताने मतदारांमध्ये मोठा उत्साह तसेच उमेदवारांमध्ये सुरस पाहायला मिळत आहे. आज सकाळी ७ वाजल्यापासूनच विविध ठिकाणी मतदानाला सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी ईव्हीएममध्ये झालेले तांत्रिक बिघाड, शिवाय मतदारांच्या यादीतील गोंधळ हे वगळता बाकी सर्वत्र सुरळीत मतदान सुरु आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मतदानाचा टक्का देखील चांगलाच वाढल्याचे दिसत आहे.

नाशिक जिल्ह्यात सकाळी साधारण: १२ पर्यंत १७.५७ टक्के मतदान झाले आहे. यात त्र्यंबकेश्वरमध्ये ३१. ५५ टक्के इतक्या सर्वाधिक मतदानाची नोंद देखील करण्यात आली आहे. तर येवल्यात १०.४६ टक्के असे सर्वात कमी मतदान झाले आहे. यापाठोपाठ इगतपुरीमध्ये ११.३० पर्यंत एकूण ४८०१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यात प्रामुख्याने २६२९ पुरुष, २१७१ स्त्रियांचा समावेश असलायची माहिती आहे. यामुळे मतदानाचा टक्का १९.१४ % इतका आहे. बुलढाणा जिल्ह्यात सरासरी १९.७९% मतदानाची नोंद देखील करण्यात आली आहे.

बुलढाणा जिल्ह्यात बुलढाणा नगरपरिषदेत १४.८७% इतकी मतदानाची टक्केवारी होती. तर चिखलीत १२.००%, जळगाव जामोद २०.८८% खामगावमध्ये २०.९८%, लोणार २२.२७%, मलकापूर २४.७०%, मेहकर २३.३९%, नांदुरा २१.४५ %, शेगाव २१.११ %, सिंदखेड राजा २३.४८% सरासरी १९.७९% काही काळा आधी बुलढाण्यात हि मतांची टक्केवारी होती.

हिंगोलीत सकाळच्या वेळेची मतदानाची टक्केवारी २२.४१ टक्के नोंदवली गेली आहे. तर गडचिरोली दुपारी १२ वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी देखील समोर आली आहे. गडचिरोली नगर परिषदेत २३.८२ टक्के, देसाईगंज या ठिकाणी २२.१८ टक्के, आरमोरीत २१.९८ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील चार नगरपालिकेसाठी दोन तासात २७.२९ टक्के मतदान झाले आहे. यात तळोदा नगरपालिकेसाठी सर्वाधिक ८.५८ टक्के मतदान झाले, तर नंदुरबारमध्ये ५.२१ टक्के, शहादामध्ये ८.०९ टक्के, नवापूरमध्ये ६.४१ टक्के इतक्या मतदानाची नोंद यावेळी करण्यात आली.

नांदेड जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी किती?
नगरपालिका / नगरपंचायत मतदानाची टक्केवारी
देगलूर 24.04%
बिलोली 24.38%
कुंडलवाडी 26.38%
उमरी 13.30%
मुदखेड 19.36%
भोकर 17.75%
हिमायतनगर 26.39%
किनवट 15.51%
हदगाव 13.50%
लोहा 21.20%
कंधार 17.60%

शहर/नगरपरिषद मतदानाची टक्केवारी
मेढा 39.39%
रहिमतपूर 28.80%
म्हसवड 23.33%
मलकापूर 21.90%
वाई 20.80%
कराड 19.44%
सातारा 18.12%
पाचगणी 15.35%
पुणे जिल्ह्यात सरासरी 20.22 टक्के मतदान नोंदवले गेले असून मंचर नगरपंचायतीत सर्वाधिक मतदानाची नोंद करण्यात आली आहे.

नगरपरिषद/नगरपंचायत मतदानाची टक्केवारी
मंचर (नगरपंचायत) 27.83%
चाकण नगरपरिषद 23.60%
जुन्नर नगरपरिषद 21.03%
राजगुरनगर नगरपरिषद 17.24%
शिरूर नगरपरिषद 13.23%

नगरपरिषद/नगरपंचायत मतदानाची टक्केवारी
ढाणकी (नगरपंचायत) 23.50%
दिग्रस 19.15%
वणी 18.76%
दारव्हा 18.51%
उमरखेड 18.43%
आर्णी 17.53%
घाटंजी 16.21%
पांढरकवडा 15.85%
पुसद 15.74%
नेर 11.99%
एकूण टक्केवारी 18.26%

नगरपरिषद मतदानाची टक्केवारी
जामखेड 27.14%
राहता 23.82%
संगमनेर 21.65%
शेवगाव 20.14%
राहुरी 19.83%
श्रीगोंदा 16.81%
शिर्डी 16.46%
श्रीरामपूर 15.80%
सोलापूर जिल्ह्यात सरासरी 19.46 टक्के मतदान झाले. दूधनी नगरपालिकेत सर्वाधिक 31.37 टक्के मतदान झाले आहे. करमाळा नगरपरिषदेत 23.17 टक्के मतदानाची नोंद झाली.

नगरपालिका मतदानाची टक्केवारी
दूधनी 31.37%
मैंदर्गी 26.99%
मोहोळ 24.43%
करमाळा 23.17%
अकलूज 22.62%
अक्कलकोट 21.94%
बार्शी 19.58%
सांगोला 17.46%
पंढरपूर 15.00%
कुर्डुवाडी 12.81%

नगरपरिषद/नगरपंचायत मतदानाची टक्केवारी
डहाणू नगरपरिषद 21.15%
वाडा नगरपंचायत 19.55%
पालघर नगरपरिषद 19.31%
जव्हार नगरपरिषद 18.93%

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या