Home / महाराष्ट्र / Maharashtra Local Body Elections 2025 : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांची प्रतिष्ठा पणाला; कोण मारणार बाजी?

Maharashtra Local Body Elections 2025 : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांची प्रतिष्ठा पणाला; कोण मारणार बाजी?

Maharashtra Local Body Elections 2025 : महाराष्ट्रतही अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी यासंदर्भात...

By: Team Navakal
Maharashtra Local Body Elections 2025
Social + WhatsApp CTA

Maharashtra Local Body Elections 2025 : महाराष्ट्रतही अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी यासंदर्भात पत्रकार परिषद घेत घोषणा केली आहे. जवळपास १० वर्षांनंतर होणारी हि निवडणूक महाराष्ट्राचं राजकारण पूर्णपणे बदलायला निर्णायक ठरणार आहे. या निवडणूकित सत्ताधाऱ्यांची चांगलीच कसोटी लागणार आहे. या निवडणुकीत महायुतीकडून कोणते नवीन चेहेरे दिसणार हे पाहणे तितकेच महत्वाचे ठरणार आहे.

या निवडणुकीत सत्ताधारी असो किंवा मग विरोधक आपापल्या नेत्यासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये खरी कसोटी लागणार आहे. खर तर प्रत्यक निवडणुकीचा गाभा हा त्याचा कार्यकर्ता असतो. आणि या राजकीय पक्षांची प्रमुख ताकत देखील हाच कार्यकर्ता असतो. गेली अनेक वर्ष या निवडणूक रखडल्या होत्या त्यामुळे नवीन चेहऱ्यानं संधी मिळत न्हवती आता या निमित्ताने हि संधी उपलबध होणार आहे.

दुसरीकडे माविआ तसेच मनसेसाठी हि निवडणूक निर्णायक ठरणार आहे. हि निवडणूक त्यांच्या अस्तित्वाची खरी कसोटी सांगणारी निवडणूक ठरेल. मागच्या वर्षी विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर हे तिन्ही पक्ष काही प्रमाणात खचून गेल्याचे देखील दिसले परंतु आता या निवडणुकीत या पक्षांचे कॉमबॅक होणार का हे पाहणे देखील तितकेच महत्वाचे ठरणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, यंदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या दोन टप्प्यांत घेण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात २४६ नगर परिषदा आणि ४२ नगर पंचायतींसाठी २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार आहे. तर; ३ डिसेंबरला निवडणुकांचे निकाल जाहीर होतील. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात जिल्हापरिषद व महापालिका निवडणुकांची देखील घोषणा होईल. त्यामुळे या निवडणुकांमध्ये कोण बाजी मारणार आणि कोणाचा पराभव होणार हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे.


हे देखील वाचा – Bihar Voting : बिहारच्या मतदानाचे सर्व विक्रम मोडले; मागच्या वर्षापेक्षा या वर्षी सर्वाधिक मतदान..

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या