Home / महाराष्ट्र / गोहत्या बंदी कायद्यावरून महायुतीमध्ये मतभेद? सदाभाऊ खोत यांची सरकारवर उघडपणे नाराजी

गोहत्या बंदी कायद्यावरून महायुतीमध्ये मतभेद? सदाभाऊ खोत यांची सरकारवर उघडपणे नाराजी

Sadabhau Khot

Sadabhau Khot: महाराष्ट्रामध्ये गेल्याकाही दिवसांपासून गोहत्या बंदी आणि कथित ‘गोरक्षकांकडून’ होणारी दादागिरी हा विषय सध्या चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच पमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पोलिसांना या प्रकरणात कारवाई करण्याचे अधिकार दिले आहेत. आता आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी देखील याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

या कायद्यामुळे शेतकरी त्यांच्या अनुत्पादक गायी आणि बैलांची विक्री करू शकत नाहीत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. शेतकऱ्यांसाठी दुग्धव्यवसाय (Dairy farming) हा उत्पन्नाचा एक महत्त्वाचा स्त्रोत आहे, असे खोत म्हणाले. याबाबत हिंदुस्तान टाईम्सने वृत्त दिले आहे.आधी शेतकरी अनुत्पादक जनावरे विकायचे, पण आता कायदा असल्यामुळे त्याला ग्राहकच नाही,” असे खोत म्हणाले. यामुळे शेतकऱ्यांना विनाकारण जनावरे पाळावी लागत आहेत.

जर्सी गायींना वगळण्याची मागणी

सदाभाऊ खोत यांनी या कायद्याची व्याप्ती फक्त भारतीय जातीच्या गायींपुरती मर्यादित असावी, अशी मागणी केली आहे. ते म्हणाे की, “शेतकऱ्यांकडे असलेल्या 90% गायी जर्सी-हायब्रिड जातीच्या आहेत आणि फक्त 10% भारतीय जातीच्या आहेत.” त्यामुळे या कायद्यातून जर्सी गायींना वगळले पाहिजे. तसेच, गोशाळांनी शेतकऱ्यांकडून जनावरे मोफत घेण्याऐवजी ती योग्य बाजारभावाने खरेदी करावीत, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

खोत यांनी अनेक ‘गोरक्षकांवर’ खंडणीखोरीचाआरोप केला. ते म्हणाले की, “हे लोक जनावरे घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना अडवतात आणि त्यांच्यावर हल्ले करतात.”

दरम्यान, उपमुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन केवळ पोलिसांनाच अशा वाहनांची तपासणी करण्याचा अधिकार असल्याचे परिपत्रक जारी केले आहे.