Home / महाराष्ट्र / Local Body Election: महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचा गुलाल! नगरपालिका निवडणुकीत भाजपचा ऐतिहासिक विजय; पंतप्रधान मोदींकडून जनतेचे आभार

Local Body Election: महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचा गुलाल! नगरपालिका निवडणुकीत भाजपचा ऐतिहासिक विजय; पंतप्रधान मोदींकडून जनतेचे आभार

Maharashtra Local Body Election Results : महाराष्ट्रातील 288 नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुकीत महायुतीने विरोधकांचा धुरळा उडवत दणदणीत विजय संपादन केला...

By: Team Navakal
Maharashtra Local Body Election Results
Social + WhatsApp CTA

Maharashtra Local Body Election Results : महाराष्ट्रातील 288 नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुकीत महायुतीने विरोधकांचा धुरळा उडवत दणदणीत विजय संपादन केला आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील महायुतीने 200 हून अधिक नगरपालिकांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

एकट्या भाजपचे 100 हून अधिक नगराध्यक्ष निवडून आले असून, या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले आहेत.

पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्याकडून कौतुक

या विजयावर प्रतिक्रिया देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की, “नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकीत भाजप आणि महायुतीला आशीर्वाद दिल्याबद्दल मी महाराष्ट्रातील जनतेचा ऋणी आहे. हा विजय आमच्या जन-केंद्रित विकासकामांवरील विश्वासाचे प्रतीक आहे.”

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीदेखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे अभिनंदन केले. मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या धोरणांवर जनतेने दिलेली ही मोहोर असल्याचे शाह यांनी नमूद केले.

देवेंद्र फडणवीस यांनी मांडली विजयाची आकडेवारी

मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विजयाचा सविस्तर तपशील दिला. फडणवीस म्हणाले की, “मी आधीच भाकीत केले होते की 75 टक्के नगराध्यक्ष महायुतीचे असतील आणि जनतेने तसाच निकाल दिला आहे. भाजप पुन्हा एकदा राज्यातील पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे.”

  • नगराध्यक्ष: भाजपचे जवळपास 129 नगराध्यक्ष निवडून आले आहेत.
  • नगरसेवक: 2017 मध्ये भाजपचे 1602 नगरसेवक होते, आता ही संख्या दुप्पट होऊन 3325 वर पोहोचली आहे.
  • वाटा: एकूण नगरसेवकांपैकी एकट्या भाजपचे 48 टक्के नगरसेवक निवडून आले आहेत.

महायुतीचा बोलबाला आणि कार्यकर्त्यांचा जल्लोष

या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनीही चांगली कामगिरी केली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मुंबईतील नरिमन पॉईंट येथील कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांसोबत विजयाचा जल्लोष साजरा केला.

प्रशासकीय राजवटीनंतर झालेली ही निवडणूक आगामी राजकीय समीकरणांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. जनतेने विकासाच्या अजेंड्याला साथ दिल्याने महायुतीचे बळ आता अधिक वाढले आहे.

Web Title:
संबंधित बातम्या