Home / महाराष्ट्र / Voter List : महापालिका निवडणुकीसाठी नवीन मतदार यादी प्रसिद्ध; मोबाईलवर घरबसल्या तपासा तुमचे नाव आणि डाऊनलोड करा यादी

Voter List : महापालिका निवडणुकीसाठी नवीन मतदार यादी प्रसिद्ध; मोबाईलवर घरबसल्या तपासा तुमचे नाव आणि डाऊनलोड करा यादी

Maharashtra Voter List : महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होत आहे. या महत्त्वाच्या निवडणुकीसाठी मुख्य निवडणूक...

By: Team Navakal
Voter List
Social + WhatsApp CTA

Maharashtra Voter List : महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होत आहे. या महत्त्वाच्या निवडणुकीसाठी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी विशेष सखोल फेरनिरीक्षण मोहिमेअंतर्गत (SIR) मतदारांची अद्ययावत यादी प्रसिद्ध केली आहे.

आता मतदारांना स्वतःचे नाव शोधण्यासाठी मतदान केंद्रावर किंवा बुथवर तासनतास रांगेत उभे राहण्याची गरज नाही. निवडणूक आयोगाने ही सर्व माहिती डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून दिली असून, नागरिक घरबसल्या आपल्या मोबाईलवर मतदार यादी डाऊनलोड करू शकतात.

ही अद्ययावत यादी https://mahasec.maharashtra.gov.in/ आणि https://mahasecvoterlist.in/ या अधिकृत पोर्टल्सवर जिल्हानिहाय आणि विधानसभा मतदारसंघानुसार पाहता येईल. याद्वारे तुम्हाला तुमच्या मतदारसंघातील उमेदवारांची संख्या आणि तुमच्या मतदान केंद्राची (बूथ) माहिती देखील झटपट मिळेल.

मतदार यादी डाऊनलोड करण्याची सोपी पद्धत (Step-by-Step):

  • जर तुम्हाला तुमची मतदार यादी डाऊनलोड करायची असेल, तर खालील स्टेप्स फॉलो करा:
  • अधिक सुलभतेसाठी तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये Matadhikar Mobile App देखील डाऊनलोड करू शकता.
  • सर्वप्रथम आपल्या मोबाईल किंवा संगणकावर https://mahasec.maharashtra.gov.in/ ही वेबसाईट उघडा.
  • होमपेजवर असलेल्या Voter Search या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर Local Self Government Voterlist हे नवीन पेज उघडेल.
  • तिथे Search Name In VoterList या पर्यायाची निवड करा.
  • आता तुम्ही तुमचा EPIC नंबर (ओळखपत्र क्रमांक) टाकून किंवा थेट स्वतःच्या नावाने सर्च करू शकता.
  • यादी डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या Download Voter list या पर्यायावर क्लिक करा.
  • येथे तुम्हाला Draft List, Final List किंवा Booth List यापैकी आवश्यक तो पर्याय निवडता येईल.
Web Title:
संबंधित बातम्या