Maharashtra Municipal Elections : मुंबई-ठाण्यासह राज्यातील प्रलंबित २९ महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर करण्यात आला आहे. या महापालिका निवडणुकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. आणि त्याचा निकाल १६ जानेवारी रोजी लगेचच लागणार आहे. त्यासाठीच राज्यात आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन या संधर्भात घोषणा केली. राज्यातील २९ महापालिकांसाठी ३ कोटी ४८ लाख मतदार मतदान करणार आहेत.
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका मागच्या पाच ते सात वर्षांपासून किंबहुना त्याहूनही अधिक कालावधीपासून प्रलंबित होत्या. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग आता मोकळा करण्यात आला आहे. त्यामध्ये सुरुवातीला २ डिसेंबर रोजी नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुका घेण्यात आल्या होत्या. आता त्यानंतर राज्यातील प्रलंबित २९ महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम देखील जाहीर झाला आहे.
Municipal Corporations Election Schedule : महापालिकेच्या निवडणुकांचे वेळापत्रक
नामनिर्देशन पत्र स्वीकारणे – २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर
अर्जाची छाननी – ३१ डिसेंबर पर्यंत केली जाईल.
उमेदवारी माघारीची मुदत – २ जानेवारी पर्यंत असणार आहे.
चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवार यादी – ३ जानेवारी पर्यंत असेल.
मतदान – १५ जानेवारी रोजी पार पडणार.
निकाल – १६ जानेवारी रोजी लागणार आहे.
राज्यातील २७ महापालिकांची मुदत अखेर संपली आहे. त्यासोबत जालना आणि इचलकरंजी या दोन नवीन महापालिकांच्या निवडणुका देखील होणार आहेत. या महापालिका निवडणुकांसाठी १ जुलै २०२५ रोजीची मतदान यादी ग्राह्य धरण्यात येईल. ही यादी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आली असल्याने त्यामध्ये नावे वगळण्याचे अधिकार राज्य आयोगाला नसतील असं आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
एकूण मतदार – ३.४८ कोटी
एकूण मतदार केंद्र – ३९, १४७
मुंबईसाठी मतदार केंद्र – १०,१११
कंट्रोल यूनिट – ११,३४९
बॅलेट यूनिट – २२,०००
महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज फक्त ऑफलाईन पद्धतीनेच भारत येणार आहे. तसेच ज्या उमेदवारांकडे सध्या जात वैधता प्रमाणपत्र नाही त्यांना निवडणुकीपासून सहा महिन्यांच्या आत सादर करावं लागणार असलायची माहिती देखील आयोगाने दिली.
Municipal Corporations Election List : यावेळी कोणत्या महापालिकांमध्ये निवडणूक होणार?
१. बृहन्मुंबई – २२७
२. भिवंडी-निजामपूर – ९०
३. नागपूर – १५१
४. पुणे – १६२
५. ठाणे – १३१
६. अहमदनगर – ६८
७. नाशिक – १२२
८. पिंपरी-चिंचवड – १२८
९. औरंगाबाद – ११३
१०. वसई-विरार – ११५
११. कल्याण-डोंबिवली – १२२
१२. नवी मुंबई – १११
१३. अकोला – ८०
१४. अमरावती – ८७
१५. लातूर – ७०
१६. नांदेड-वाघाळा – ८१
१७. मीरा-भाईंदर – ९६
१८. उल्हासनगर – ७८
१९. चंद्रपूर – ६६
२०. धुळे – ७४
२१. जळगाव – ७५
२२. मालेगाव – ८४
२३. कोल्हापूर – ९२
२४. सांगली-मिरज-कुपवाड – ७८
२५. सोलापूर – ११३
२६. इचलकरंजी – ७६
२७. जालना – ६५
२८. पनवेल – ७८
२९. परभणी – ६५
हे देखील वाचा – Radish Leaves : मुळ्यांच्यी पाने दररोजच्या जीवनात ठरतात उपयुक्त; आश्चर्यकारक आरोग्यदायी फायदे आणि हिवाळ्यातील सोप्या पाककृती









