अमरावती – राज्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला असून अनेक जिल्ह्यांत जनजीवन विस्कळीत झाले आहे. अकोला व अमरावती (Akola and Amravati)जिल्ह्यांत मुसळधार पाऊस झाल्याने ग्रामीण भागात ढगफुटीसदृश परिस्थिती निर्माण झाली. सातारा, सांगली (Sangli)आणि कोल्हापूर (Kolhapur)जिल्ह्यांत १९ ऑगस्टपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबई, ठाणे (Thane) व पालघरमध्ये (Palghar) दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम राहिला. मुंबईतील तुळशी तलाव (Tulsi Lake)ओसंडून वाहू लागला असून ऊर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, भातसा, विहार आणि तुळशी तलावांमध्ये ९०.१६ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे.
रायगड जिल्ह्यातील अंबा नदीने (Amba River)धोका पातळी ओलांडली, तर रत्नागिरीत नारंगी नदीला पूर आला. या पुरामुळे खेड-दापोली मार्गावरील (Khed–Dapoli road) वाहतूक ठप्प झाली. गड नदीची पाणीपातळी वाढून दोन दिवसांत दुसऱ्यांदा माखजन बाजारपेठेत (Makhanj market)पाणी शिरले. माल दुसरीकडे हलविण्यासाठी बोटी आणण्यात आल्या. जगबुडी नदीनेही (Jagbudi River) खेड शहरात धोक्याची पातळी ओलांडली. दापोली-खेड मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. चिपळूण शहरातही मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले.
अमरावती (Amravati) जिल्ह्यात ढगफुटी सदृश पावसाने शेकडो हेक्टर शेतीचे नुकसान झाले. मोर्शी, वरुड, तिवसा भागात शेतात पाणी शिरले. तिवसा तालुक्यातील मोजरी गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग-६ वरील नवीन बायपासवर भूस्खलन (landslide) झाले. ज्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. मूर्तिजापूर आणि अकोट तहसीलमधील अनेक भागांत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. अकोला शहरातील मुख्य रस्ते जलमय झाले. अमरावती-यवतमाळ जिल्ह्यांतील पावसामुळे वर्धा नदीची पाणीपातळी वाढून घुग्गूस-गडचंदूर मार्गावरील भोयगाव पूल पाण्याखाली गेला. खबरदारीचा उपाय म्हणून मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला.
वाशीम (Washim)जिल्ह्यात अडाण नदीला पूर आला. अडाण प्रकल्पामध्ये ७३.३९ टक्के पाणीसाठा झाला. पाण्याची आवक वाढत असल्याने अडाण प्रकल्पाचे ५ दरवाजे प्रत्येकी ७० सेंमीने उघडण्यात आले. तर जिल्ह्यातील १४ मंडळात अतिवृष्टी झाली. कोंडाळा झामरे परिसरातील अचानक आलेल्या पुरसदृश पाण्याच्या लोंढ्यात तब्बल ४० जनावरे वाहून गेली.
यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यामध्ये काल सकाळपासूनच संततधार पावसाने थैमान घातले होते. अशात उमरखेड तालुक्यातील चातारी या गावात १३० तर सावळेश्वर गावात २० आणि शिवाजीनगर येथील ८० घरात पाणी शिरले. जवळपास ४५० पेक्षा अधिक घरांची पडझड आणि नदी नाल्यांना पूर आला आहे. चांदूर बाजार तालुक्यात आणि तिवसात अनेक गावात पाणी शिरले.
धुळे शहरातील अनेक सखल भागांत तसेच धुळे पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या (SP’s office.)चहूबाजूंनी पाणी मोठ्या प्रमाणात साचले. जळगावच्या धरणगाव शहरातील धरणी परिसरात सलग दुसऱ्या दिवशी धरणी नाल्याला प्रचंड पूर आल्याने परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले. पुराचे पाणी दुकाने व घरांमध्ये शिरले. परिणामी धरणी परिसर आणि जैन गल्ली पूर्णपणे जलमय झाला.
नागपूर (Nagpur)जिल्ह्याच्या भिवापूर तालुक्यातील नांद नदीत दुचाकीस्वार वाहून गेला. भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यात दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. यात लाखांदूर तालुक्यातील चपराळ पहाडीजवळ अंगावर वीज कोसळल्याने मनोहर कुंभले (६८) यांचा मृत्यू झाला.
बीडमध्ये (Beed)मागील दोन दिवसांपासून दमदार पावसाने हजेरी लावली. या पावसाने राजुरी गावातून वाहणारी डोमरी नदी दुथडी भरून वाहत आहे. धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील घोडकी परीसरात मागील तीन दिवसात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जात