Home / महाराष्ट्र / महाराष्ट्रातील शाळा 8 आणि 9 जुलैला बंद राहणार? ‘हे’ आहे कारण

महाराष्ट्रातील शाळा 8 आणि 9 जुलैला बंद राहणार? ‘हे’ आहे कारण

Maharashtra Schools | महाराष्ट्रातील (Maharashtra Schools) हजारो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आणि अनुदानाच्या दिरंगाईविरोधात 8 आणि 9...

By: Team Navakal
Maharashtra Schools

Maharashtra Schools | महाराष्ट्रातील (Maharashtra Schools) हजारो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आणि अनुदानाच्या दिरंगाईविरोधात 8 आणि 9 जुलै 2025 रोजी राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन (Maharashtra Schools Teachers Strike) करणार आहेत. यामुळे राज्यातील सर्व शाळा दोन दिवस बंद राहण्याची शक्यता आहे.

पालक आणि विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन शिक्षक संघटनांनी केले आहे. अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांमधील कर्मचाऱ्यांनी सरकारच्या आश्वासनांवर कार्यवाही न झाल्याने हा निर्णय घेतला आहे.

गेल्या वर्षी 1 ऑगस्ट 2024 पासून शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी 75 दिवसांचे आंदोलन केले होते. त्यावेळी सरकारने अनुदानित शाळांसाठी निधीची तरतूद करण्याचे आश्वासन दिले होते. 10 ऑक्टोबर 2024 रोजी मंत्रिमंडळ बैठकीतही हा मुद्दा उपस्थित झाला, परंतु 14 ऑक्टोबर 2024 च्या शासकीय निर्णयात निधीची तरतूद झाली नाही. यामुळे शिक्षकांमध्ये असंतोष वाढला, आणि त्यांनी पुन्हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.

8 आणि 9 जुलै रोजी हजारो शिक्षक आणि कर्मचारी मुंबईतील आझाद मैदानावर निदर्शने करणार आहेत. अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांमधील कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघटना, संयुक्त मुख्याध्यापक संघटना आणि इतर शिक्षक संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

या दोन दिवसीय शाळा बंदमुळे राज्यातील शिक्षण व्यवस्थेवर तात्पुरता परिणाम होईल. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी पालकांना आगाऊ तयारी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शिक्षक संघटनांनी सरकारला मागण्या पूर्ण करण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची मागणी केली आहे, अन्यथा शाळा बंदचा कालावधी वाढू शकतो.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या