Maharashtra SSC Result 2025 | महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) लवकरच इयत्ता दहावी (SSC) परीक्षेचा निकाल 2025 जाहीर करणार आहे. बारावीचा निकाल 5 मे 2024 रोजी लागल्यानंतर आता सर्वांचे लक्ष दहावीच्या निकालाकडे लागले आहे.
बारावीचा निकाल लवकर लागल्यामुळे पदवी प्रवेश प्रक्रिया देखील लवकर सुरू होण्याची शक्यता आहे. रिपोर्टनुसार, बोर्ड मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत निकाल जाहीर करू शकते. दहावीचा निकाल 14 अथवा 15 मे ला लागण्याची शक्यता आहे.
यावर्षी एकूण 16,11,610 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे. यामध्ये 8,64,120 मुले, 7,47,471 मुली आणि 19 तृतीयपंथी विद्यार्थ्यांचा समावेश आहे. आता हे सर्व विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. बोर्डाने 3 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी दरम्यान मुंबई, पुणे, नागपूर आणि कोकणसह विविध विभागांमध्ये प्रात्यक्षिक परीक्षा (आयोजित केल्या होत्या.
निकाल कसा तपासायचा?
निकाल जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थी खालील वेबसाइट्सवर त्यांचे निकाल ऑनलाइन पाहू शकतील:
mahresult.nic.in – निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर (Roll Number) आणि आईचे पहिले नाव (Mother’s First Name) वापरून लॉग इन करावे लागेल.
निकाल पाहण्याची सोपी प्रक्रिया:
अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in ला भेट द्या.
- होमपेजवर ‘Maharashtra SSC or Class 10 Result 2025’ लिंक शोधा.
- विद्यार्थ्यांनी त्यांची लॉग इन माहिती भरा.
- महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावीचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
- विद्यार्थी स्कोअरकार्ड तपासू आणि भविष्यातील संदर्भासाठी डाउनलोड करू शकतात.
उत्तीर्ण होण्यासाठी किमान गुण:
महाराष्ट्र एसएससी परीक्षा 2025 उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयात आणि एकूणच किमान 33 टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. गेल्या वर्षी, एकूण 5,58,021 विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य (75 टक्क्यांहून अधिक गुण) मिळवले होते. एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 95.81 टक्के होती, ज्यात मुलांपेक्षा मुलींनी चांगली कामगिरी केली होती. मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी 97.21 टक्के, तर मुलांची 94.56 टक्के होती.
गेल्या वर्षीची कामगिरी:
गेल्या वर्षी, बोर्डाने 95.81 टक्के उत्तीर्णतेची नोंद केली होती, ज्यात कोकण विभागाने 99.01 टक्के उत्तीर्णतेसह अव्वल स्थान पटकावले होते. यामुळे 2025 साठी उच्च मापदंड तयार झाला आहे.
पुनर्मूल्यांकन आणि गुणपडताळणी:
ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांवर समाधानी नसेल, ते निकाल जाहीर झाल्याच्या दोन आठवड्यांच्या आत पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करू शकतात. बोर्ड जुलै 2025 मध्ये पुरवणी परीक्षा आयोजित करेल, ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचे गुण सुधारण्याची संधी मिळेल.