Devendra Fadnavis: महाराष्ट्रामध्ये ‘त्रिभाषा सूत्र’ 100 टक्के लागू करणारच! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठाम

Maharashtra Three Language Formula

Maharashtra Three Language Formula | महाराष्ट्रात शालेय अभ्यासक्रममध्ये त्रिभाषा सूत्र (Maharashtra Three Language Formula) लागू करण्यावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. हे सूत्र राज्यात 100 टक्के लागू होईल, अशी ठाम भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) घेतली.

एका मुलाखतीमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रामध्ये ‘त्रिभाषा सूत्र’ 100 टक्के लागू करणार असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या बंधूंनी हिंदी सक्तीला विरोध दर्शवला आहे, ज्यामुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

त्रिभाषा सुत्रावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की,“आधीच्या जीआरवरून चर्चा झाली होती की तिसरी भाषा हिंदीच का? आम्ही इतर पर्यायही देण्याचा निर्णय घेतला. हिंदी निवडायची असेल तर ठीक, नाहीतर दुसरी भारतीय भाषा शिकवण्यास तयार आहोत, पण त्यासाठी किमान 20 विद्यार्थी हवेत. नाहीतर ऑनलाइन शिकवणं शक्य होईल.” ते मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, तिसरीपासून भाषा शिकल्याने विद्यार्थ्यांच्या आकलनशक्तीचा आणि बौद्धिक विकास होतो, जसं की राष्ट्रीय शैक्षणिक धोरणमध्ये सुचवण्यात आलं आहे.

फडणवीस यांनी ठामपणे सांगितलं की, “ही आमची प्रतिष्ठेची लढाई नाही, पण त्रिभाषा सूत्र महाराष्ट्रात लागू होईलच. कधीपासून हे समिती ठरवेल, पण 100 टक्के अंमलबजावणी होईल. इंग्रजीला पायघड्या घालून भारतीय भाषांचा विरोध मी सहन करणार नाही.”

फडणवीस यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्र एकीकरण समितीने त्यांच्यावर टीका केली आहे. “आपण खरंच मराठी राज्याचे मुख्यमंत्री आहात का? नागरिकांचे सेवक आहात की हुकूमशहा?” मराठी माणसानं तिसरी भाषा नको, असं स्पष्ट केलं आहे.