Maharashtra Weather : मागच्या काही महिन्यांपासून पावसाची तीव्रता सगळ्यांनीच अनुभवली, आणि आता त्यात भर म्हणून मोंथा चक्रीवादळीचे सावट देखील होते पण आता मोंथा चक्रीवादळी (Cyclone Montha) वाऱ्यांची तीव्रता कमी झाली असून आता हे वारे मध्य भारताच्या दिशेनं कूच करत असल्याची माहिती आहे. त्यामुळे ही प्रणाली पुढे सरकत असताना महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरण निर्मिती होताना दिसत आहे. मात्र ही स्थिती राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी लागू होणारी नाही. कारण, काही जिल्ह्यांमध्ये आता सूर्य डोक्यावर आल्यानंतर होणाऱ्या भयंकर उकाड्याला सामोरे जावे लागत आहे. तर, मुंबईसह नवी मुंबई आणि उपनगरीय भागांमध्ये उष्मा वाढून आर्द्रतेमुळं या झळा आणखी तीव्र झाल्या आहेत.
उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये पुढील २४ तासांमध्ये ताशी ३० ते ४० किमी वेगानं वाहणाऱ्या वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता असलयाचे हवामान विभागाच्या मुंबई शाखेने सांगितले आहे.
विदर्भातही चित्र काही वेगळं नसून इथं पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. पुढच्या २४ तासांमध्ये राज्यात तापमानवाढ होणार असून, काही भागांमध्ये पहाटेच्या वेळी गारठासुद्धा जाणवणार असल्यानं एकाच वेळी राज्यात तीन ऋतूचक्रांचा परिणाम दिसून येईल कि काय अशी चिन्ह सध्या दिसत आहेत.

मागील २४ तासांमध्ये कोकणातील काही भागांमध्ये विदर्भातही पावसाने चांगलीच हजेरी लावली. हीच परिस्थिती आज देखील कायम राहणार असून प्रामुख्यानं अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली इथं विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी असेल. तर, पालघरपासून कोकणातील किनारपट्टी क्षेत्रांमध्ये ढगाळ वातावरणासह पावसाच्या हलक्या सरी बरसतील असा प्राथमिक अंदाज देखील हवामान खात्याने वर्तवला आहे.
देशभरातील हवामान कस आहे?
दक्षिणेकडील राज्यांमध्ये तुरळक ठिकाणी ढगाळ हवामान वगळता उर्वरित राज्यांमध्ये आकाश निरभ्र राहील. शिव्या, हिमालयावरून वाहत येणाऱ्या शीतलहरींनी जोर धरला असून आता या शीतलहरींचा परिणाम जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या राज्यांमध्ये होताना दिसत आहे. तर, राजस्थानात जैसलमेरच्या तप्त वाळवंटातही रात्रीच्या वेळी तापमानात घट होताना दिसत आहे.
हे देखील वाचा –
Sanjay Raut :संजय राऊतांना गंभीर आजाराची लागण; दोन महिने सार्वजनिक जीवनाला ब्रेक..
 
								 
								 
								 
								 
								 
				 
															 
								 
								 
								 
								 
								 
								








