Home / महाराष्ट्र / Maharashtra Weather Update : राज्यभरात पुन्हा एकदा मुसळधारेचा इशारा..

Maharashtra Weather Update : राज्यभरात पुन्हा एकदा मुसळधारेचा इशारा..

Maharashtra Weather Update : गेल्या काही महिनांपासून पावसाने राज्याला चांगलंच हैराण केलं आहे. देशभरातून नैऋत्य मोसमी पावसाने माघार घेतली असली...

By: Team Navakal
Maharashtra Weather Update

Maharashtra Weather Update : गेल्या काही महिनांपासून पावसाने राज्याला चांगलंच हैराण केलं आहे. देशभरातून नैऋत्य मोसमी पावसाने माघार घेतली असली तरी आता बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रीय झाल्याने राज्यभरात अवकाळी पावसाचे संकट परत एकदा डोकं वर काढताना दिसत आहे.

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, आजपासून पुढील पाच दिवस महाराष्ट्रात वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण, गोवा, मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

गेल्या २-३ महिन्यांमध्ये मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात पूरपरिस्थिती होती. अनेक जनावरे दगावली, घरे पाण्याखाली गेली, मोठी पडझड देखील झाली. झालेल्या नुकसानातून आता कुठे बाहेर येत असतानाच पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं सावट महाराष्ट्र व्यापताना दिसत आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आजपासून, कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना मुसळधारेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे २१ ऑक्टोबरपासून पुढे ५ दिवस वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस येण्याची दाट शक्यता आहे.

या भागाला दिला अलर्ट –
२१ ऑक्टोबर रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग,पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर,लातूर, नांदेड, परभणी ,हिंगोली ,वाशिम ,अकोला, यवतमाळ ,चंद्रपूर, गडचिरोली जिल्हाला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय .

२२ ऑक्टोबरला रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर,धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, बुलढाणा या बघत यलो अलर्ट कायम राहील.

२३ ऑक्टोबरला देखील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर ,बीड, नांदेड, वाशिम ,यवतमाळ, वर्धा ,चंद्रपूर गोंदिया, गडचिरोली या भागाला यलो अलर्ट देण्यात आला आहे.

२४ ऑक्टोबर रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग ,कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नगर, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ ,वर्धा, नागपूर, चंद्रपूर ,गडचिरोली या भागात देखील मुसळधारेचा इशारा दिला आहे.

२५ऑक्टोबरला रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, नगर ,संभाजीनगर, बीड, धाराशिव, संपूर्ण विदर्भात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.


हे देखील वाचा – 

NCP Offer : राष्ट्रवादीतून ऑफर होती पण पक्षनिष्ठा ठेवली आणि भले झाले ! मोहोळांच्या विधानाने चर्चा

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या