Maharashtra Weather Update : सप्टेंबरमध्ये झालेल्या जोरदार पावसानंतर मुंबई आणि आसपासच्या भागात पुन्हा एकदा ‘ऑक्टोबरची उष्णता’ आणि उकाडा जाणवत आहे. मंगळवारी शहरातील तापमान 33 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले होते, तर आर्द्रता 61 टक्के इतकी उच्च होती.
दुसरीकडे, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मुंबईसह ठाणे, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांच्या काही भागांत जोरदार पाऊस झाला होता, ज्यामुळे नागरिक आणि शेतकरी चिंतेत आहेत.
नैऋत्य मोसमी पावसाने माघार घेतल्यावरही, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्राच्या अनेक भागांत अवकाळी पावसाचे (Maharashtra Weather Update) मोठे संकट उभे राहिले आहे. हवामान विभागाने (IMD) 21 ऑक्टोबरपासून पुढील 5 दिवसांसाठी राज्यभरात वादळी पावसाचा इशारा दिला आहे.
Maharashtra Weather Update : उष्णतेनंतर दिलासा
मुंबईत सध्या उच्च आर्द्रता असली तरीहवामानात बदल अपेक्षित आहे. अरबी समुद्रावरील हवामान प्रणालीतील बदलांमुळे, शनिवार संध्याकाळपासून हलक्या पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे कमाल तापमान 31 ते 32 अंश सेल्सियसपर्यंत खाली येऊ शकते. आरोग्य तज्ज्ञांनी उष्णता टाळण्यासाठी सुती कपडे परिधान करण्याचा आणि सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/jw7yrf9chD भेट घ्या. pic.twitter.com/fxLTuqvhYq
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) October 21, 2025
महाराष्ट्रातील अवकाळी पावसाचा 4 दिवसांचा सविस्तर अंदाज (22 ते 25 ऑक्टोबर)
IMD ने कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांसाठी वादळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
तारीख | प्रभावित होणारे प्रमुख जिल्हे |
22 ऑक्टोबर (आज) | कोकण: रत्नागिरी, सिंधुदुर्ग. पश्चिम महाराष्ट्र: सातारा, सांगली, कोल्हापूर. मराठवाडा/विदर्भ: धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, बुलढाणा. |
23 ऑक्टोबर | कोकण: रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. पश्चिम महाराष्ट्र: पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर. विदर्भ: वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर. |
24 ऑक्टोबर | कोकण: रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. मध्य महाराष्ट्र: कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नगर (अहमदनगर), सोलापूर. मराठवाडा/विदर्भ: बीड, धाराशिव, लातूर, अमरावती, नागपूर. |
25 ऑक्टोबर | मध्य महाराष्ट्र: पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, नगर. मराठवाडा/विदर्भ: संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, धाराशिव, संपूर्ण विदर्भ विभाग. |
शेतकऱ्यांनी उभी पिके आणि जनावरे सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
हे देखील वाचा – Mahesh Kothare: ‘भाजप म्हणजे आपलं घर; मी मोदींचा…’; महेश कोठारेंचे वक्तव्य चर्चेत