Maharashtra Weather : राज्यात काही ठिकाणी परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. असं म्हणतात काही गोष्टी प्रमाणापेक्षा जास्त झाल्याकी त्या आवडेनाश्या होतात तसाच काहीस या पावसाळ्याबरोबर झालं आहे. कधी पाऊस तर कधी ऊन असं चक्र आता सुरु आहे. हवामानातील सतत होणाऱ्या बदलामुळे सगळेच त्रस्त आहेत. त्यामुळे आता राज्यात थंडी नेमकी कधी सुरु होईल? याकडे सगळ्यांच लक्ष लागून राहील आहे. नोव्हेंबर मध्यनंतर थंडी सुरु होईल, असा अंदाज हवामान विभागाने सुरु व्यक्त केला आहे.
राज्यात यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. मराठवाड्यात सरासरीपेक्षा ३९ टक्के अधिक पाऊस पडला. सध्या तेथे तापमानही सरासरीपेक्षा अधिक असल्याची माहिती आहे. सकाळी कमी तापमान आणि दुपारपासून उन्हाच्या झळा जाणवत आहेत आणि मध्येच पाऊस त्यामुळे नागरिक घमाच्या धारांनी प्रचंड
हैराण केलं आहे.

‘राज्यात डिसेंबर, जानेवारीमध्ये थंडी जाणवण्याची जास्त शक्यता आहे. नोव्हेंबरमध्ये तापमानत घट होण्याची शक्यता देखील त्यांनी वर्तवली आहे. नोव्हेंबर महिन्याच्या मध्यानंतर थंडी सुरु होईल, असा अंदाज देखील हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
हे देखील वाचा –
Rohit Pawar in Trump Aadhaar Case : रोहित पवारांवर डोनाल्ड ट्रम्पच्या बनावट आधारकार्ड प्रकरणी गुन्हा









