Maharashtra Working Hours: महाराष्ट्र सरकार (Maharashtra government) लवकरच खासगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल (Maharashtra Working Hours) करण्याची शक्यता आहे. कामगार विभागाने ‘महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना (रोजगार नियमन आणि सेवा शर्ती) अधिनियम, 2017’ मध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्याचा प्रस्ताव दिला आहे.
हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, या प्रस्तावामध्ये कर्मचाऱ्यांच्या कामाची कमाल वेळ सध्याच्या 9 तासांवरून 10 तास प्रतिदिन करण्याचा विचार आहे. (Maharashtra Working Hours)
या कायद्यानुसार राज्यात दुकाने, हॉटेल्स आणि मनोरंजनाच्या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास नियंत्रित केले जातात.
कामगार विभागाचे 5 महत्त्वाचे बदल
कामगार विभागाने 2017 च्या या कायद्यात सुमारे पाच मोठे बदल प्रस्तावित केले आहेत. यापैकी सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे कामाचे तास वाढवणे.
प्रस्तावित दुरुस्तीनुसार, कोणताही प्रौढ कामगार कोणत्याही कामाच्या ठिकाणी दिवसाला 10 तासांपेक्षा जास्त वेळ काम करू शकणार नाही.
याशिवाय, सलग सहा तासांपेक्षा जास्त काम करण्यासाठी कर्मचाऱ्याला अर्धा तासाचा ब्रेक देणे बंधनकारक असेल. सध्या हा ब्रेक पाच तासांनंतर दिला जातो.
तीन महिन्यांसाठी ओव्हरटाइमची मर्यादा 125 तासांवरून 144 तासांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे. सध्या प्रतिदिन कमाल कामाचे तास (ओव्हरटाइमसह) 10.5 तास आहेत, ते वाढवून 12 तास करण्याचाही प्रस्ताव आहे.
तातडीच्या कामाच्या बाबतीत, 12 तासांची कमाल मर्यादा काढून टाकण्याचाही विचार आहे, ज्यामुळे कामाच्या तासांना कोणतीही कमाल मर्यादा राहणार नाही.
नवीन नियमांचा कोणाला फायदा?
सध्या हा कायदा 10 किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या आस्थापनांना लागू आहे. मात्र, नव्या प्रस्तावानुसार तो 20 किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या आस्थापनांना लागू होईल.
रिपोर्टनुसार, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा झाली, परंतु काही मंत्र्यांनी अधिक स्पष्टीकरण मागितल्यामुळे यावर तात्काळ निर्णय घेण्यात आला नाही.
ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा
हे देखील वाचा –
हृतिक रोशनने गर्लफ्रेंडला भाड्याने दिला मुंबईतील आलिशान फ्लॅट; किती आहे भाडे? जाणून घ्या