Home / महाराष्ट्र / BMC Election: मुंबईत महायुती एकत्र; पण…; मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली महानगरपालिका निवडणुकीची रणनीती

BMC Election: मुंबईत महायुती एकत्र; पण…; मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली महानगरपालिका निवडणुकीची रणनीती

BMC Election: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Local Body Elections) निवडणुका आता लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र...

By: Team Navakal
BMC Election

BMC Election: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Local Body Elections) निवडणुका आता लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीनिमित्त आयोजित केलेल्या स्नेहसंमेलन कार्यक्रमात पत्रकारांशी संवाद साधताना महायुतीची निवडणूक रणनीती स्पष्ट केली.

मुंबई, पुणे, ठाणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांमध्ये महायुती नेमके काय धोरण अवलंबणार, याबद्दलची उत्सुकता त्यांनी दूर केली.

मुंबईत एकत्र, इतरत्र स्वतंत्र

राज्याच्या राजकारणात सत्तेवर असलेल्या भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी या तिन्ही मित्रपक्षांनी मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणूक एकत्र लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, मुंबई महानगरपालिकेत महायुती 100 हून अधिक जागा मिळवून बहुमताचा आकडा नक्कीच पार करेल आणि मुंबईत महायुतीचाच महापौर असेल.

मुंबई वगळता, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नवी मुंबई या महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये महायुतीतील तिन्ही मित्रपक्ष स्वतंत्रपणे मैदानात उतरणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, या ठिकाणी तिघांचीही ताकद असल्याने एकत्र लढून फायदा होणार नाही, तर स्वतंत्र लढल्यास जास्त जागा जिंकण्याची शक्यता आहे.

पमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गड मानल्या जाणाऱ्या ठाणे महानगरपालिकेबाबत (Thane) मात्र अद्याप निश्चिती झालेली नाही. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, ठाण्याबाबतचा निर्णय एकनाथ शिंदे यांना विचारूनच घेतला जाईल; त्यांनी युतीत लढायचे म्हटले, तर युतीत, अन्यथा स्वतंत्रपणे निवडणुकांना सामोरे जाऊ.

निवडणुकांनंतर पुन्हा एकत्र

मुंबई वगळता इतर महानगरपालिकांमध्ये स्वतंत्र निवडणूक लढवणार असले, तरी निवडणुकांनंतर हे तिन्ही पक्ष पुन्हा एकत्र येण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. कोणत्याही परिस्थितीत विरोधकांना फायदा होऊ देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. या निवडणुका जानेवारी महिन्यात होण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे.

हे देखील वाचा – Gold Price: सोन्याच्या किंमतीत अचानक मोठी घसरण होण्याचे कारण काय? जाणून घ्या

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या