Mahayuti Manifesto BMC Election 2026 : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर आज महायुतीने आपला वचननामा जाहीर केला. या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले उपस्थित होते. महायुतीच्या वचननाम्यात नागरिकांसाठी विविध सामाजिक, आर्थिक आणि नागरी सुविधांशी संबंधित मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.
वचननाम्यातील प्रमुख घोषणांमध्ये महिलांसाठी बेस्ट प्रवासावर ५० टक्के सवलत, तर तरुण बहिणींना ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्जाची सुविधा यांचा समावेश आहे. तसेच शहरातील पायाभूत सुविधा, रस्ते, वाहतूक व्यवस्था, पाणीपुरवठा आणि स्वच्छतेसंदर्भातील सुधारणा करण्याच्या योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. महायुतीचे नेतृत्व या योजना अमलात आणून मुंबईत नागरिकांचे जीवनमान उंचावण्याचा संकल्प व्यक्त करत आहे.
महायुतीच्या वचननाम्याद्वारे शहरातील प्रत्येक घटकाच्या गरजा लक्षात घेऊन योजना आखण्याचा प्रयत्न केला गेला असून, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील मतदारांमध्ये महायुतीच्या धोरणात्मक दिशा स्पष्ट करण्याचा उद्देश असल्याचे दिसून येते.
मुंबईकरांसाठी महायुतीच्या ८७ मोठ्या घोषणा- (BJP-Shivsena Manifesto BMC Election 2026)
१. ९ मीटरपेक्षा जास्त लांबीच्या सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण
२. काँक्रिटी रस्त्यांचे खोदकाम टाळण्यासाठी डक्ट बसवणार
३. प्रायवेट ले आऊटच्या रस्त्यांचे डांबरीकरण करणार
४. रस्ते खोदावे लागणाऱ्या १७ सेवांसाठी युटिलिटी टनेल उभारणार
५. रस्त्यांसंबंधीच्या सूचना डिजीटल फलकाद्वारे देणार
६. सर्व फुटपाथ स्टँप्ड काँक्रिटचे करणार
७. पात्र फेरीवाल्यांचे हॉकिंग झोन्समध्ये पुनर्वसन करणार
८. रस्त्यांवरच्या पार्किंगसाठी कम्युनिटी पार्किंग सुरू करणार
९. रस्त्यांवर रिक्षा आणि दुचाकींसाठी पार्किंग सुरु करणार
१०. भुयारी आणि जमिनीवर नवे पार्किंग स्थळ उभारणार
११. सर्व मोकळ्या जागांची देखभाल महापालिकेकडूनच करणार
१२. संपूर्ण मुंबईला २४ तास पाणीपुरवठा करणार
१३. मुंबईचा पाणीपुरवठा ३८०० एमएलडी वरुन ४७०० एमएलडीवर नेणार
१४. पुढील पाच वर्षे पाणीपट्टी स्थिर, वर्षाला ८ टक्क्यांची पाणीवाढ स्थगित
१५. मुंबईचे सर्व रस्ते कचरामुक्त करणार
१६. झोपडपट्य्यांतील कचऱ्यांसाठी छोट्या गाड्या पुरवणार
१७. मागेल त्याला शौचालय धोरण राबवणार
१८. कामगार भरती करुन सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन वाढवणार
१९. झिरो वेस्ट वॉर्ड विकसित करणार
२०. निर्माणाधीन सांडपाणी प्रक्रल्प वेळेत पूर्ण करणार
२१ . सांडपाणी वाहिन्या आधुनिक करणार
२२. हवा प्रदूषण रोखण्यासाठी सर्वसमावेशक पर्यावरणीय धोरण
२३. १७ हजार कोटी रुपयांची पर्यावरण संवर्धन योजना राबवणार
२४. जपानी तंत्रज्ञान वापरुन मुंबईला पाच वर्षात पूरमुक्त करणार
२५. पूर रोखण्यासाठी ४ नवीन भूमिगत फ्लडवॉटर टाक्या उभारणार
२६. हवेचा दर्जा तपासणाऱ्या स्टेशनांची संख्या दुप्पट करणार
२७. आयआयटी आणि व्हीजेटीआय (VJTI) च्या मदतीने ‘सी व्ह्युईंग डेक’ बनवणार
२८. संपूर्ण शहरात झाडे आणि ग्रीन झोनची संख्या वाढवणार
२९. दर्जेदार शिक्षणासाठी महापालिका शाळांचे स्तर आंतरराष्ट्रीय मानकांपर्यंत उंचावणार
३०. महानगरपालिकेच्या सर्व शाळामध्ये AI लॅब्स तयार करणार.
३१. मनपाच्या रुग्णालयांचा दर्जा एम्स (AIIMS) च्या धर्तीवर सुधारणार
३२. प्रत्येक प्रशासकीय वॉर्डमध्ये डायलिसिस सेंटर आणि केमोथेरपी सेंटर उभे करणार
३३. ६० वर्षांवरील नागरिकांना वर्षातून एकदा मोफत पूर्ण शरीर तपासणी
३४. ‘मुंबईकर हेल्थ कार्ड’ निर्माण करुन प्रत्येक मुंबईकराचा वैद्यकीय इतिहास डिजिटल स्वरूपात जतन करणार
३५. प्रत्येक वॉर्डात ३०-४० प्रकारच्या रक्त चाचण्या, औषधे आणि प्राथमिक उपचार मोफत देणारी केंद्रे उभारणार
३६. मधुमेह,रक्तदाब, कर्करोगाची मोफत तपासणी करणारे फिरते दवाखाने सुरु करणार
३७. पालिकेच्या रुग्णालयांबाहेर 24 तास चालणारी स्वस्त दरातली जेनेरिक औषधे देणार
३८. केईएम, नायर, सायन आणि कूपर रुग्णालयांना संलग्न परिधीय रुग्णालये उभारणार
३९. सर्विकल आणि ब्रेस्ट कॅन्सरची मोफत तपासणी करणार
४०. टाटा हॉस्पिटलच्या धर्तीवर मनपाचे कॅन्सर रुग्णालय उभारणार, केमोथेरपी आणि रेडिएशन मोफत देणार
४१. मुंबई मधुमेहमुक्त करणार
४२. हृदयरुग्णांसाठी खास हॉस्पिटल, सवलतीच्या दरात अँजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरी करणार
४३. कॅन्सर रुग्णांसाठी नायर रुग्णालयात १० मजली रुग्णालय उभारणे सुरू, ते अत्याधुनिक व्यवस्थांनी युक्त असेल, सुपर स्पेशालिटी सेंटरही उभारणार
४३. मुंबईत वैद्यकीय शिक्षण क्षमता दुप्पट करणार
४४. प्रत्येक मोठ्या BMC रुग्णालयात नवीन वैद्यकीय कॉलेज/PG इन्स्टिट्यूट उभारणार
४५. Med Tech च्या धर्तीवर प्रशिक्षण देणारे हॉस्पिटल्स वाढवणार
४६. ७५ वर्षांवरील नागरिकांसाठी ऑन कॉल रुग्णवाहिका व रुग्णांच्या निवासस्थानी डॉक्टर तपासणी
४७. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीप्रमाणे महापौर निधी उभारणार, ५० हजारांपर्यंतची मदत करणार
४८. मुंबईतील सर्व भाजी मंडई यांचे नूतनीकरण व पुनर्विकास करणार
४९. बीएमसी मार्केटमध्ये मासळी विक्रेत्यांसाठी कोल्ड स्टोरेज उभारणार
५०. संपूर्ण मुंबईमध्ये LUX सर्वे करणार
५१. गोराई/मनोरी गावांचा विकास आराखडा तयार करणार
५२. झोपु योजनेत सध्या १७ प्रकल्पांचा समावेश, संख्या अजून वाढवणार
५३. प्रकल्प बाधितांसाठी घरे उपलब्ध करून देणार
५४. २० हजार इमारतींचे रखडलेले भोगवटा प्रमाणपत्र (OC) तात्काळ देणार
५५. सफाई कामगारांना हक्काची घरे देणार
५६. शासकीय,निमशासकीय, मनपा कर्मचाऱ्यांसाठी गृहनिर्माण प्रकल्प राबवणार
५७. बेस्ट बस प्रवासामध्ये महिलांना ५० टक्के सवलत देणार
५८. बेस्टच्या ताफ्यात २०२९ पर्यंत सर्व बसेस इलेक्ट्रिक राहतील
५९. बेस्ट बसेसची संख्या ५ हजारांवरून १० हजारांवर नेणार
६०. सर्व बस थांब्यांवर डिजिटल डिस्प्ले, सीसीटीव्ही कॅमेरे, मोबाईल चार्जिंग पॉइंट्स आणि वाय-फाय सुविधा देणार
६१. बेस्ट डेपोमध्ये वाचनालये उभारणार
६२. आगीच्या ठिकाणी अग्निशमन दल ५ मिनिटांत पोहचेल अशी व्यवस्था उभारणार
६३. उंच इमारतींच्या आगीच्या सर्वेक्षण,बचावासाठी थर्मल कॅमेऱ्यांचे ‘फायर सर्व्हिलन्स ड्रोन्स’चा वापरणार
६४. सर्व गृहनिर्माण संस्था आणि व्यावसायिक इमारतींना ‘डिजिटल फायर ऑडिट’ सक्तीचे करणार
६५.प्रत्येक प्रशासकीय वॉर्डात जागतिक दर्जाचे स्पोर्ट कॉम्प्लेक्स व स्विमिंग पूल बांधणार
६६. ३ विभागांत स्टार्ट अप, इन्नोवेशन हब उभारण्यासाठी १०० कोटी देणार
६७. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी प्रत्येक वॉर्डात वातानुकूलित, वाय-फाय सज्ज आणि चोवीस तास ६८. सुरू राहणाऱ्या अभ्यासिका उभारणार
६९. लाडक्या बहिणींना ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज देणार
७०. महिला बचत गटांच्या वस्तू विकण्याकरिता ई-मार्केट स्थापन करणार
७१. कामकरी महिलांसाठी प्रत्येक वॉर्डात परवडणाऱ्या दरांतली पाळणाघरे उभारणार
७२. मुंबईत महिलांसाठी मुबलक शौचालय बांधणार
७३. महिला बचत गटांना शून्य टक्के व्याजाने कर्ज
७४’मुंबई डिजिटल सखी’ अंतर्गत महिलांना एआय, कोडिंग आणि ऑनलाइन मार्केटिंगचे मोफत प्रशिक्षण
७५. महिलांच्या सुरक्षिततेसाठी ‘रात्रीचे गस्त पथक’ आणि त्वरित मदतीसाठी वन-टॅप मोबाईल अॅप बनवणार
७६. सार्वजनिक ठिकाणांवर, रेल्वे स्टेशन, बस स्टॉप, पार्क आणि हॉस्पिटल इत्यादी ठिकाणी सुरक्षा वाढवणार
७७. मुंबई रोहिंग्या व बेकायदेशीर बांगलादेशी मुक्त करणार
७८मराठी भाषेच्या संवर्धन,प्रसारासाठी स्वतंत्र मराठी भाषा विभाग स्थापणार
७९. प्रत्येक विभागात मराठी नाटक, लोककला आणि साहित्यासाठी सुसज्ज ‘मराठी कला केंद्र’ आणि अभ्यासिका
८०. फक्त मराठी चित्रपटांकरीता खास मराठी मल्टिप्लेक्स उभारणार
८१. मराठी कलाकारांच्या संस्थांना महापालिकेतर्फे पाठबळ देणार
८२. बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी वर्षात विविध कार्यक्रम राबवणार
८३. मराठी तरुणांसाठी शिक्षण-रोजगार-उद्योजक यांच्याकरिता धोरण राबवण्यात येईल
८४. बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय विद्यापीठ उभारणार
८५. मराठी तरुणांसाठी मुंबई Fellowship सुरू करणार
८६. परवडणाऱ्या घरांचे धोरण राबवून मराठी माणसाला हद्दपार होण्यापासून रोखणार
८७. ईस्टर्न फ्री वे घाटकोपरच्या पुढे ठाण्यापर्यंत नेणार









