Home / मनोरंजन / Mahesh Manjrekar on Salman khan : सलमान खानसोबत चित्रपट करायला महेश मांजरेकरांचा नकार? सलमानच्या चित्रपटांबद्दल महेश मांजरेकरांचं मोठं विधान..

Mahesh Manjrekar on Salman khan : सलमान खानसोबत चित्रपट करायला महेश मांजरेकरांचा नकार? सलमानच्या चित्रपटांबद्दल महेश मांजरेकरांचं मोठं विधान..

Mahesh Manjrekar on Salman khan : महेश मांजरेकर हे मराठी मनोरंजन विश्वातील एक मोठं नाव आहे. महेश मांजरेकर यांनी आजवर...

By: Team Navakal
Mahesh Manjrekar on Salman khan

Mahesh Manjrekar on Salman khan : महेश मांजरेकर हे मराठी मनोरंजन विश्वातील एक मोठं नाव आहे. महेश मांजरेकर यांनी आजवर अनेक हिंदी – मराठी सिनेमांच्या लेखन-दिग्दर्शनातुन आपलं काम प्रेक्षकांना दाखवलं आहे. एवढंच नव्हे, त्यांनी मराठीसोबत बॉलिवूडमध्येही आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर आपल्या कामाची भुरळ पाडली आहे.

सगळ्यांनाच माहिती आहे महेश मांजरेकर आणि सलमान खान यांची किती घट्ट आणि चांगली मैत्री आहे. पण अशातच नुकत्याच एका मुलाखतीत महेश मांजरेकरांनी सलमानसोबत चित्रपट नसल्याचं सांगितलं आहे.

एका मुलाखतीदरम्यान ते म्हणाले, ”मी सलमान खानचा अंतिम नावाचा चित्रपट केला. आणि जर मला कोणी विचाराल की, सलमान खानचा दुसरा चित्रपट करशील का? तर मी सरळ नाही अस म्हणीन. सलमानला असं वाटतं, त्याला सिनेमा कळतो. त्याचे वडील देखील मेकर आहेत. पण मी वेगळा आहे. मी थोडासा हेड स्ट्राँग माणूस आहे. त्यामुळे एकदा काही कारणास्तव सलमान रात्री ३ वाजता मला भेटायला आला.

सलमान खान त्यावेळी महेश मांजरेकरांना म्हणालेला,”तुम्ही मला शिव्या का दिल्या”. त्यावर मी त्याला म्हणालो ,”मी तुला शिव्या देत नसून तुझ्यात जो दिग्दर्शक लपलाय त्याला शिव्या देतो आहे. तू चित्रपट मला दिला आहेस ना मग आता बाकी विसरुन जा”. अशाप्रकारे महेश यांनी हा याबद्दलचा खुलासा केला. सलमान खानची प्रमुख भूमिका असलेल्या ‘अंतिम’ सिनेमाचं दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केलं होतं.


हे देखील वाचा – TATA Motors Name Change: टाटा मोटर्सने नाव बदललं? नेमक्या कोणत्या नावाने शेअर बाजारात ओळखली जाणार कंपनी!

Web Title:
For more updates: , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या