Makar Sankranti 2026 : संक्रांतीचा सण जवळ येताच घराघरातून तिळाच्या लाडूंचा खमंग सुगंध अनुभवायला मिळतो. या पारंपरिक सणात तिळाचे लाडू केवळ चविष्ट नसून, आरोग्यासाठीही लाभदायक मानले जातात. मात्र, अनेक गृहिणींना या लाडू बनवताना अडचणी येतात. काही वेळा लाडू खूप कडक होतात, तर काही वेळा व्यवस्थित वळताही येत नाहीत. त्यामुळे संक्रांताच्या उत्सवात लाडूंची खरी मजा कमी होते. तिळाचे लाडू योग्य प्रमाणात गोडसर, मऊ आणि व्यवस्थित वळवता येण्यासाठी काही सोप्या टिप्स उपयुक्त ठरतात.
१) मऊ लाडूसाठी साध्या गुळाऐवजी चिक्कीचा गूळ वापरणं टाळावे. चिक्कीचा गूळ प्रामुख्यानं कडक चिक्कीसाठी वापरला जातो. लाडू मऊ हवे असतील तर साधा सेंद्रीय गूळ किंवा केमिकल विरहित पिवळा गूळ वापरावा तसंच तीळ स्वच्छ निवडून घेणे महत्वाचे असते.
२) तीळ भाजताना घाई अजिबात करू नका. मंद आचेवर तीळ गुलाबी होईपर्यंत भाजून घाव्येत. तीळ जास्त भाजले तर लाडू कडू लागू शकतात आणि कमी भाजले तर चिवट लागू शकतात. तीळ छान फुलले की ते एका ताटात काढून पूर्णपणे गार होऊ द्या.
३) लाडू कडक होण्याचं कारण म्हणजे गुळाचा पाक अतिश जास्त पक्का होणं. एका कढईत थोडं तूप घालून त्याच चिरलेला गूळ घालावा. गूळ विरघळला की त्याला फेस येईल. आणि त्यानंतर एका वाटीत पाणी घेऊन त्याच गुळाचे २ थेंब घाला. जर त्या थेंबाची मऊ गोळी तयार झाली कि मग समाज पाक तयार आहे. जर गोळी कडक झाली किंवा तिचा आवाज झाला तर लाडू कडक होऊ शकतात. त्यामुळे गोळी मऊ असतानाच गॅस बंद करणे आवश्यक आहे.
४) लाडू केवळ मऊच नाही तर खुसखुशीत होण्यासाठी एक चिमूटभर खाण्याचा सोडा किंवा एक चमचा साजूक तूप देखील तुम्ही यात घालू शकता. यामुळे लाडूला चकाकी येते आणि ते दाताला अजिबात चिकटत नाही.
५) मिश्रण गरम असतानाच लाडू वळावे आवश्यक. हात भाजू नये म्हणून हाताला थोडं पाणी किंवा तूप लावा जेने करून लाडू करताना हात भाजणार नाही. जर मिश्रण हाताला जास्त चटके देत असेल तर चमच्यानं त्याचे छोटे छोटे भाग ताटात काढून ठेवा आणि थोडं कोमट झालं की पटकन मग लाडू वळून घ्यावेत.
हे देखील वाचा – Mohammed Shami : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला निवडणूक आयोगाची नोटीस; ‘हे’ आहे कारण









