Makeup Techniques : फक्त महागडे मेकअप (Makeup Products) प्रॉडकस घेऊन कधी कधी अर्थ नसतो. बऱ्याचदा तुम्ही मेकअप (Makeup Techniques) कसा करत आहात हे हि तितकाच महत्वाचं आहे. बऱ्याच लोकांना प्रश्न असतो कि मेकअप आधी काय काय लावावं? किंवा मेकअप करताना आधी फाऊंडेशन(foundation )लावावं कि कन्सीलर(Concealer) हा प्रश्न नवीन नवीन मेकअप शिकणाऱ्याना आवर्जून पडतातच. या बदल तुम्ही योग्य निर्णय घेतला तर तुमचा मेकअप अगदी उत्तम होऊ शकतो पण याबदल तुम्ही चुकीचा निर्णय घेतलात तर मात्र तुमचा मेकअप फसण्याची शक्यता जास्त असते.
बरेच मेकअप आर्टिस्ट आणि ब्यूटी साइट्सच्या मते सर्वात आधी फाउंडेशन लावणं योग्य मानलं जात. फाउंडेशन स्किनचा टोन इवन करतो आणि एक स्मूद आणि लाईट वेट असा बेस तयार करतो. फाउंडेशन लावल्यावर तुमचे डाग-धब्बे, डार्क सर्कल्स हे लपवायला मदत होते. त्यानंतर जिथे अजून कव्हरेज हवी, तिथे कंसीलरने टच-अप करावे. यामुळे मेकअप नॅचरल वाटतो.
जर तुम्ही आधी कंसीलर लावत असाल तर ती पद्धत चुकीची ठरू शकते. आधी कंसीलर लावला तर तो पसरतो त्यामुळे डार्क स्पॉट्स आणि डार्क सर्कल्स व्यवस्थित कव्हर होत नाहीत. कंसीलरला टार्गेटेड पद्धतीने लावने अधिक महत्त्वाचे असते, म्हणून तो शेवटी लावणं जास्त चांगले असते.
तुमच्या स्किन प्रकारानुसार करा मेकअप-
- कोरड्या त्वचेसाठी आधी हायड्रेटिंग प्रायमर, मग फाउंडेशन आणि शेवटी कंसीलर या पद्धतीने मेकअप करा.
- तेलकट त्वचेसाठी मॅट फाउंडेशन आणि मॅट कंसीलरचा वापर करावा.
- वरील दोन्ही प्रकारची त्वचा असल्यास आधी बेस टोन एकसारखा करण्यासाठी फाउंडेशन लावा.
कन्सीलर निवडण्याची योग्य पद्धत-
कोरड्या त्वचेसाठी पिंक किंवा पीच अंडरटोन असलेला कंसीलर.
तोंडावर कोणतेही डाग राहिले असतील तर त्यासाठी येलो अंडरटोन कंसीलर.
लाल डागांसाठी ग्रीन बेस कंसीलर.
द्रव्यात्म प्रोडक्ट्स कसे लावायचे?
द्रव्यात्म फाउंडेशन आणि कंसीलर साठी डॅम्प ब्यूटी ब्लेंडर वापरावा. याने प्रोडक्ट त्वचेवर नीट पसरत आणि चेहरा केकी लागत नाही. आधी फाउंडेशन लावा, मग हलक्याच हाताने कंसीलर डॉट करा आणि ब्लेंड करा. फाउंडेशन आणि कंसीलर नीट सेट झाल्यावर ट्रान्सलूसेंट पावडर लावा. त्यानंतर सेटिंग स्प्रेचा वापर करून मेकअप दिर्घकाळ ठेवू शकता.
हे देखील वाचा –
(वरील माहितीची आम्ही पुष्टी करत नाही. डॉक्टरांच्या सल्याने या गोष्टी कराव्यात.)