Malegaon Blast Case – २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट (bomb blast) प्रकरणात पीडितांच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) निर्दोष सुटलेल्या सात जणांना नोटीस बजावली. मालेगाव बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेल्या सहा जणांच्या कुटुंबियांनी आरोपींच्या निर्दोष सुटकेला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे.
या प्रकरणी मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर (Chief Justice Chandrashekhar and)आणि न्यायमूर्ती गौतम अंखर (Justice Gautam Ankare)यांच्या खंडपीठाने सरकारी वकील, राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) आणि महाराष्ट्र सरकारलाही नोटीस बजावली. या अपिलावर सहा आठवड्यांत सुनावणी होणार आहे.
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी माजी भाजपा खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर (BJP MP Pragya Singh Thakur) आणि लेफ्टनंट कर्नल प्रसाद राजपुरोहित (Prasad Purohit)यांच्यासह सात आरोपींची विशेष एनआयए न्यायालयाने (special NIA court)निर्दोष मुकत्ता केली आहे. गेल्या आठवड्यात दाखल केलेल्या याचिकेत असा दावा करण्यात आला होता की दोषपूर्ण तपास किंवा तपासातील त्रुटी आरोपींना निर्दोष सोडण्याचे कारण असू शकत नाही. हा कट गुप्तपणे रचण्यात आला होता आणि त्यामुळे त्याचे थेट पुरावे असू शकत नाहीत.
याचिकाकर्त्यांनी असाही दावा केला आहे की, विशेष एनआयए न्यायालयाने ३१ जुलै रोजी सर्व सात आरोपींना निर्दोष सोडण्याचा दिलेला आदेश चुकीचा आणि कायद्याने अयोग्य होता. त्यामुळे तो रद्द करावा. २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोटातील पीडित कुटुंबांच्या अपीलावर उच्च न्यायालयाने एनआयएला सात निर्दोष मुक्तता नोटीस बजावली.
हे देखील वाचा –
तुम्ही स्वतः जाऊन देवाला काहीतरी करण्यासाठी सांगा’; सरन्यायाधीश गवईंच्या वक्तव्यामुळे मोठा वाद
Tesla Cybertruck क्रॅश टेस्टमध्ये पास, पण एका चुकीमुळे सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; पाहा व्हिडिओ
भारतातल्या करव्यवस्थेत मोठा बदल, ‘GST 2.0 India’ मुळे गरजेच्या वस्तूंवर दिलासा