Home / महाराष्ट्र / Malegaon News : कट्टर विरोधकांची हातमिळवणी; मालेगावात नवे सत्तासमीकरण

Malegaon News : कट्टर विरोधकांची हातमिळवणी; मालेगावात नवे सत्तासमीकरण

Malegaon News : राज्यात एकमेकांचे कट्टर विरोधक मानले जाणारे काँग्रेस आणि भाजप हे पक्ष नाशिक जिल्ह्यातील मालेगावात मात्र सत्तेसाठी एकत्र...

By: Team Navakal
Malegaon News
Social + WhatsApp CTA

Malegaon News : राज्यात एकमेकांचे कट्टर विरोधक मानले जाणारे काँग्रेस आणि भाजप हे पक्ष नाशिक जिल्ह्यातील मालेगावात मात्र सत्तेसाठी एकत्र आल्याचे चित्र दिसत आहे. मालेगाव महापालिकेतील काँग्रेस आणि भाजपच्या नगरसेवकांनी एकत्र येत ‘भारत विकास आघाडी’ या नावाने गट स्थापन केला आहे.

मालेगाव महापालिका निवडणुकीत इस्लाम पक्षाने ३५ जागा जिंकत आघाडी घेतली. समाजवादी पक्षासोबत युती करून त्यांनी ‘सेक्युलर फ्रंट’ उभा केला होता. समाजवादी पक्षाला ५ जागा मिळाल्या. या दोन्ही पक्षांना मोठे मताधिक्य मिळाले असले, तरी बहुमतासाठी आवश्यक असलेला ४३ चा जादुई आकडा पार करण्यासाठी इतर पक्षांच्या पाठिंब्याची गरज होती.

दरम्यान, काँग्रेसचे ३ तर भाजपाचे २ नगरसेवक निवडून आले आहेत. या पाच नगरसेवकांनी एकत्र येत नाशिक येथील विभागीय कार्यालयात ‘भारत विकास आघाडी’ची औपचारिक स्थापना केली. या संयुक्त गटाने इस्लाम पक्ष आणि समाजवादी पक्षाच्या युतीला महापौर निवडीसाठी पाठिंबा जाहीर केला आहे.
या पाठिंब्यामुळे महापालिकेतील सत्तासमीकरणांमध्ये लक्षणीय बदल झाला असून संबंधित आघाडीचे बळ अधिक मजबूत झाले आहे. काँग्रेस-भाजपाची ही अनपेक्षित हातमिळवणी मालेगावच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. त्यामुळे शहरातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या