Home / महाराष्ट्र / Manikrao Kokate : अजित पवारांनी स्वीकारला माणिकराव कोकाटेंचा राजीनामा, ट्विटरवर पोस्ट करत दिली माहिती..

Manikrao Kokate : अजित पवारांनी स्वीकारला माणिकराव कोकाटेंचा राजीनामा, ट्विटरवर पोस्ट करत दिली माहिती..

Manikrao Kokate : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा स्वीकारल्याचे जाहीर केले आहे. माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा स्वीकारावा,...

By: Team Navakal
Manikrao Kokate
Social + WhatsApp CTA

Manikrao Kokate : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा स्वीकारल्याचे जाहीर केले आहे. माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा स्वीकारावा, असे पत्र देखील अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे. अजित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबद्दलची माहिती दिली आहे.

त्यांनी ट्विटरला पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली आहे. ते म्हणतात माननीय न्यायालयाच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील सदस्य आणि पक्षातील आमचे सहकारी माणिकराव कोकाटे यांनी आपला राजीनामा माझ्याकडे सुपूर्द केला आहे तर कायदे-नियम हे सर्वोच्च स्थानी असून ते कोणत्याही व्यक्तीपेक्षा सर्वोतोपरी आहेत, या आमच्या पक्षाच्या दीर्घकालीन भूमिकेनुसार हा राजीनामा तत्त्वतः स्वीकारण्यात आला असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे.

संवैधानिक प्रक्रियेनुसार पुढील कार्यवाहीसाठी माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा मुख्यमंत्री महोदयांकडे पाठवण्यात असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. सार्वजनिक जीवन हे नेहमीच संविधानिक नैतिकता, संस्थात्मक प्रामाणिकता आणि न्यायपालिकेच्या सन्मानावर आधारित असावं, या मूल्यांवर आमच्या पक्षाची निरंतर वाटचाल राहिली आहे असे ते म्हणतात. पुढे ते म्हणतात कायदेशीर प्रक्रियेवर आमचा ठाम विश्वास आहे. राज्यात कायदा-व्यवस्थेचं काटेकोरपणे पालन होईल, याकरिता आम्ही कटिबद्ध आहोत. लोकशाही मूल्ये जपली जातील व जनतेच्या विश्वासाला तडा जाणार नाही, त्या दृष्टीकोनातून आम्ही सदैव कार्यतत्पर राहू, अशी पोस्ट अजित पवार यांनी केली आहे.


हे देखील वाचा – Mumbai Bomb Threat : राज्यातील विविध दंडाधिकारी न्यायालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी; परिसरात भीतीचे वातावरण

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या