Dr. Shirish Valsangkar| डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येस मनिषा मुसळेच कारणीभूत; आरोपपत्रातून पोलिसांचा दावा

Dr. Shirish Valsangkar Suicide

सोलापूर – प्रसिद्ध न्युरोफिजिशियन (Neuro Physician) डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांच्या आत्महत्येस आरोपी मनिषा मुसळे कारणीभूत ठरली,असा दावा पोलिसांनी याप्रकरणी दाखल केलेल्या आरोपपत्रात केला आहे. याप्रकरणी तब्बल ५९ दिवसांनंतर आज पोलिसांनी आरोपी मनिषा मुसळे हिच्या विरोधात ७२० पानांचे दोषा रोपपत्र न्यायालयात दाखल केले.


मनिषा मुसळे ही डॉ. वळसंगकर यांच्या रुग्णालयात काम करत होती. डिसेंबर २०२४ पासून तिच्या कामकाजातील अरेरावी व आर्थिक गैरव्यवहार लक्षात आल्यानंतर, डॉ. वळसंगकर यांनी तिचे अधिकार कमी केले होते. त्यानंतर मनीषाने डॉ. वळसंगकर यांची बदनामी सुरू केली. मनीषाने डॉ. वळसंगकर यांना प्रत्यक्ष भेटून, फोनवरून आणि ईमेलद्वारे धमक्या दिल्या. मुलांना मारून, स्वतःला रुग्णालयासमोर जाळून घेईन, अशा प्रकारच्या धमक्या देत होती. याच खोट्या आरोप आणि धमक्यांमुळे व्यथित होऊन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चिठ्ठी लिहीत स्वतःच्या परवानाधारक पिस्टलमधून गोळी झाडून घेत आत्महत्या केली. त्यामुळे या प्रकरणात मनीषा मुसळे हिने भारतीय न्यायसंहिता कलम १०८ अंतर्गत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.