Home / महाराष्ट्र / Manoj Jarange : मनोज जरांगेचा सरकारला इशारा.. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन उभारणार..

Manoj Jarange : मनोज जरांगेचा सरकारला इशारा.. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन उभारणार..

Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी राज्यात उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील आता शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मैदानात उतरले असल्याचं दिसून येत आहे....

By: Team Navakal
Manoj Jarange

Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी राज्यात उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील आता शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मैदानात उतरले असल्याचं दिसून येत आहे. अतिवृष्टीमुळे राज्यातील २९ जिल्ह्यांमध्ये झालेल्या मोठ्या नुकसानीनंतरही शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचली नसल्याने, जरांगे पाटील यांनी थेट भाऊबीजेच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांसाठी आंदोलन उभारण्याचा इशारा सरकारला दिला आहे.

अतिवृष्टीमुळे राज्यात अनेक ठिकाणी शेतीच मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे, तर नदीकाठच्या जमिनी वाहून गेल्या आहेत. शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात सरकारने जाहीर केलेल्या ३ हजार कोटींच्या मदतीचा लाभ अजूनही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेला नाही. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटलांनी थेट सरकारला आंदोलन इशारा दिला आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणतात राज्यात अनेक ठिकाणी अधिकारीच सरकारपेक्षा मोठे झाले आहेत. जे काम करतच नाहीत, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करायला हवेत. दिलेली मदत ही तात्पुरता आनंद आहे, जसे देवेंद्र फडणवीस प्रत्येकाला तात्पुरता आनंद देतात,” अशा तीव्र शब्दांत त्यांनी सरकारच्या मदतीवर टीका केली आहे. ते पुढे म्हणतात, भाऊबीजेच्या दिवशी नुकसानीच्या याद्या तयार करत आहोत आणि लवकरच बैठक घेऊन राज्यात शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन देखील उभारले जाईल. शेतकऱ्यांसाठी काम करणारे अभ्यासक, तज्ज्ञ आणि नेते यांना एकत्र बोलावून आंदोलनाची दिशा हि ठरवली जाणार आहे.

सत्ताधारी आमदारांना विकास निधी म्हणून हजारो कोटींची खिरापत वाटली जाते असे देखील ते म्हणाले. भाऊबीज निमित्त लाडक्या बहिणीला आणि लाडक्या दाजीला न्याय दिल्याशिवाय शांत बसायचे नाही,” असे देखील ते म्हणाले. शेतकऱ्यांसाठी हमीभाव, कर्जमुक्ती, कुटुंबातील सदस्यांना नोकऱ्या आणि शेतीला नोकरीचा दर्जा देण्याच्या प्रमुख मागणीसाठी हे ऐतिहासिक आंदोलन उभे करणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले.


हे देखील वाचा – Mumbai BMC Election : महाविकास आघाडीत फूट? ठाकरेबंधूंच्या युतीवर भाई जगताप स्पष्टच बोलले..

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या