Home / महाराष्ट्र / Manoj Jarange : निवडणुकीच्या रणधुमाळीत आरक्षण लढवय्याची प्रकृती ढासळली; मनोज जरांगे पाटील यांना केले रुग्णालयात दाखल

Manoj Jarange : निवडणुकीच्या रणधुमाळीत आरक्षण लढवय्याची प्रकृती ढासळली; मनोज जरांगे पाटील यांना केले रुग्णालयात दाखल

Manoj Jarange : महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सध्या राज्यभर सुरू आहे. निवडणुकीसाठी उमेदवार यादी जाहीर होत असतानाच एक महत्त्वाची बातमी देखील...

By: Team Navakal
Manoj Jarange
Social + WhatsApp CTA

Manoj Jarange : महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सध्या राज्यभर सुरू आहे. निवडणुकीसाठी उमेदवार यादी जाहीर होत असतानाच एक महत्त्वाची बातमी देखील समोर आली आहे. मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अचानक बिघडल्याची माहिती समोर आली आहे. शिव्या त्यांना तात्काळ छत्रपती संभाजीनगर येथील गॅलक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

मागच्या काही दिवसांपासून सततचे दौरे आणि दगदगीमुळे त्यांना शारीरिक थकवा जाणवत होता, मात्र आज ताप भरल्याने त्यांना तातडीने वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मनोज जरांगे पाटील यांना गेल्या काही तासांपासून तीव्र ताप असल्याचे समोर आले. आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर सुरू असलेले दौरे, सभा आणि आंदोलनांच्या नियोजनामुळे त्यांच्या शरीरावर आणि मानसिक थकवा तसेक मोठा ताण आला होता.

प्रकृती बिघडल्याचे लक्षात येताच सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने गॅलक्सी रुग्णालयात दाखल केले. सध्या डॉक्टरांची एक विशेष टीम त्यांच्यावर उपचार करत असल्याची माहिती आहे. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे देखील समोर आले आहे. छत्रपती संभाजीनगरमधील मराठा समाज बांधव आणि त्यांच्या समर्थकांनी गॅलक्सी रुग्णालयाबाहेर रंगाच्या रांगा लावण्यास सुरुवात केली आहे. डॉक्टरांनी त्यांना पूर्ण विश्रांती घेण्याचाच सल्ला दिला आहे. तसेच त्यांना सध्या कोणालाही भेटण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे.

हे देखील वाचा –Pune News : पुण्यात अजित पवार आणि शिंदेंच्या युतीची साखळी? शिंदे-अजित पवार युतीवर रवींद्र धंगेकर सकारात्मक..

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या